Abasaheb More esakal
नाशिक

Nashik News: दिंडोरी प्रणीत समर्थ सेवा मार्गाचा 24 पासून जागतिक कृषी महोत्सव : आबासाहेब मोरे

महोत्सवात संशोधक, शेतकरी, विद्यार्थी यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कृषीमाऊली सन्मान देण्यात येणार असल्याची घोषणाही आयोजकांनी यावेळी केली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दुग्धव्यवसाय व स्वयंरोजगार अंतर्गत रोजगाराची संधी. सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींची नाव नोंदणी करून मार्गदर्शन करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, महिला सक्षमीकरण अंतर्गत हस्तकला, पाककला, गृहउद्योग या संदर्भात मार्गदर्शन, शेतकरी बांधवांसाठी सेवामार्गाच्या सात्त्विक कृषीधन निर्मिती अंतर्गत सात्त्विक शेतमालाची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगारांना कर्तृत्ववान,

स्वावलंबी बनविण्यासाठी मार्गदर्शन तसेच दुर्ग संवर्धन अभियान अंतर्गत ५०० हून अधिक प्राचीन शस्त्र – अस्त्र प्रदर्शनसह मोडी लिपी व शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके व शेतकरी वधू- वर परिचय मेळावा आदी भरगच्च कार्यक्रम असलेला दिंडोरी प्रणीत श्री. स्वामी समर्थ सेवा मार्गच्या वतीने २४ जानेवारीपासून पाच दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. (Dindori Praneet Samarth Seva Marga World Agriculture Festival from 24 Abasaheb More Nashik News)

अशी माहिती कृषी महोत्सव आयोजक आबासाहेब मोरे यांनी दिली. यावेळी श्री. त्र्यंबकेश्‍वर गुरुपीठाचे व्यवस्थापक चंद्रकांतदादा मोरे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, श्रमिक सेना संस्थापक अध्यक्ष सुनील बागूल, के. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे आदी उपस्थित होते.

महोत्सवात संशोधक, शेतकरी, विद्यार्थी यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कृषीमाऊली सन्मान देण्यात येणार असल्याची घोषणाही आयोजकांनी यावेळी केली.

कार्यक्रमाची रूपरेषा

२४ जानेवारी रोजी कृषी दिंडीने महोत्सवास सुरवात होईल. दुपारी २ ते ४ वाजे दरम्यान उद्घघाटन सोहळा होईल. सायं. ५ ते ६ दरम्यान कृषी उद्योजकता युवा विचारमंथन कार्यक्रम व याच दिवशी कृषी सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

२५ जानेवारी : सकाळी विषमुक्त शेती आणि दुपारी पशुगोवंश दुग्धव्यवसाय चर्चा, सायं. ५ ते ६ : कृषी या विषयावर राजकीय मान्यवर यांचे समवेत युवा विचारमंथन कार्यक्रम होईल.

२६ जानेवारी : सकाळी पर्यावरण व दुर्ग संवर्धन व दुपारी स्वयंरोजगार व महिला सक्षमीकरण मेळावा, सायं. ५ ते ६ : कृषी या विषयावर सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांचे युवा विचारमंथन हा कार्यक्रम होईल.

२७ जानेवारी : शेतकरी वधू-वर परिचय मेळावा, सायं. ५ ते ६ : कृषी या विषयावर आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर यांचे युवा विचारमंथन हा कार्यक्रम होईल.

२८ जानेवारी : माहिती तंत्रज्ञान जनजागृती, सायबर सुरक्षा, दुपारी सरपंच, ग्रामसेवक मांदियाळीने महोत्सवाची सांगता होईल. सायं. ५ ते ६ कृषी या विषयावर सिने क्षेत्रातील क्षेत्रातील मान्यवर यांचे समवेत युवा विचारमंथन हा कार्यक्रम होईल. “Krushi Mahotsav” किंवा “Dindori Pranit Sevamarg” या युट्युब चॅनेलद्वारे रोज कृषी तज्ञांचे मार्गदर्शन ऑनलाइन पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT