Dindori taluka and 11 revenue circle exceeds annual average rainfall nashik news 
नाशिक

Water Scarcity: दिंडोरी तालुका अन् 11 मंडळांत पर्जन्याच्या सरासरीचे शतक! जिल्ह्यात सर्वत्र पाणीबाणीची स्थिती

संतोष विंचू

Nashik Water Scarcity : पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना जिल्हाभर अजूनही वरुणराजा मनसोक्त बरसला नसल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. पावसाचे माहेरघर दुष्काळीपट्टा देखील वंचित राहिल्याने जिल्ह्यातील केवळ दिंडोरी तालुक्यात आणि १११ पैकी फक्त ११ महसूल मंडळात (सर्कल) पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे.

भौगोलिकदृष्ट्या विभाजन, पर्जन्यछायेचा प्रदेश आणि पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन यांसह विविध भौगोलिक कारणांमुळे पावसाचे स्वरूप बदलत आहे. त्यातच जिल्ह्यातील मालेगाव, येवला, सिन्नर, नांदगाव, चांदवड व देवळा या तालुक्यांवर नेहमीच पावसाची मात्रा रुसलेली दिसते. (Dindori taluka and 11 revenue circle exceeds annual average rainfall nashik news)

जिल्हा दर वर्षीच पर्जन्याबाबतीत पूर्व व पश्चिम भागात विभागला जातो. यंदाही असेच चित्र असून, कुठे कमी तर कुठे जास्त पावसाची नोंद झाली असली तरी जिल्ह्याची वार्षिक सरासरी १०२३ मिलिमीटर असताना आतापर्यंत केवळ ६४५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. मागील वर्षी हेच प्रमाण १२९ टक्क्यांवर होते.

एकट्या दिंडोरीने ओलांडली सरासरी

जिल्ह्यातील १५ पैकी केवळ दिंडोरी तालुक्यात यंदा १०७ टक्के पाऊस पडला असून, उर्वरित तालुके ८० टक्क्यांच्या खालीच आहेत. सर्वाधिक कमी पाऊस नांदगावमध्ये ५४, सिन्नरमध्ये ५८, तर मालेगाव, चांदवडमध्ये ६२ टक्के पाऊस पडला आहे.

ननाशी मंडळात सर्वाधिक २७२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. याउलट करंजाळी मंडळात अवघा २६, विंचूर मंडळात ३० टक्के, ठाणपाडा, नांदगाव (इगतपुरी) मंडळात अवघा ३१ टक्के पाऊस पडल्याचे चित्र आहे. यंदा सुरवातीपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील धरणे सरतेशेवटी भरलेत.

१०० मंडळे तहानलेले!

जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांत फक्त ११ महसूल मंडळांनी सरासरीचे शतक गाठले आहे. कळवाडी, मुल्हेर, दळवट, अभोना, उमराळे, ननाशी, कोशिंबे, कसबे वणी, पांढुर्ली, नायगाव आणि अंदरसूल या ११ मंडळांतच या वर्षी सरासरीची शंभरी ओलांडली आहे. याव्यतिरिक्त १०० मंडळे मात्र पर्जन्यछायेतच राहिली असून, ७५-८० टक्क्यांच्या दरम्यान येथे पाऊस पडला आहे.

याशिवाय वडांगळी, वावी, राजापूर, ठाणपाडा, दाभाडी, बाणगाव, रामशेज, नांदगाव, टाकेद, करंजाळी, विंचूर, ठाणपाडा आदी १५ मंडळांत ४० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडल्याने आत्ताच येथे पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. नांदगाव, सुरगाणा, नाशिक, इगतपुरी, पेठ, चांदवड, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांत एकाही मंडळाला सरासरी ओलांडता आलेली नाही.

असे आहे वार्षिक पर्जन्यमान अन् पावसाचे आकडे !

तालुका - वार्षिक पर्जन्यमान - झालेला पाऊस - टक्के

नाशिक - ७८१ - ५३० - ६७

इगतपुरी - ३१६८ - १६७५ - ५२

दिंडोरी - ७६२ - ८१७ - १०७

पेठ - २१२४ - १५०० - ७०

त्र्यंबकेश्वर - २२४४ - १६१६ - ७२

मालेगाव - ५३९ - ३३२ - ६१

नांदगाव - ५८३ - ३१५ - ५४

चांदवड - ६०९ - ३८५ - ६३

कळवण - ७३६ - ६३१ - ८५

बागलाण - ५६७ - ३६७ - ६४

सुरगाणा - १९९२ - १५०५ - ७५

देवळा - ५०९ - ३०५ - ५९

निफाड - ५४६ - ३५२ - ६४

सिन्नर - ६३० - ३६८ - ५८

येवला - ५४४ - ४१७ - ७६

जिल्हा सरासरी - १०२३ - ६४५- ६९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

SCROLL FOR NEXT