dipika-chavan esakal
नाशिक

Dipika Chavan News: कांद्याला 3 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्या : दिपिका चव्हाण

सकाळ वृत्तसेवा

Dipika Chavan News : केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लागू करण्याचा निर्णय हा कांदा उत्पादक शेतकरी यांना आर्थिक खाईत लोटणारा आहे.

त्याचबरोबर सरकारने २ हजार ४१० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे दोन लाख टन कांदा खरेदीचा घेतलेला निर्णय म्हणजे निर्यातशुल्क वाढीच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न असून यातून कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा उद्ध्वस्त होणार आहे.

त्यामुळे सरकारने कांदा सरसकट तीन हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करून दिलासा द्यावा, अशी मागणी बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. (Dipika Chavan statement Give onion price Rs 3 thousand per quintal nashik)

केंद्रातील मोदी सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लागू करण्याचा तुघलकी निर्णय जाहीर केल्याने देशभर कांदा उत्पादकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

यातच सरकारने २ हजार ४१० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे दोन लाख टन कांदा खरेदीचा घेतलेला निर्णय म्हणजे निर्यातशुल्क वाढीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्‍यांचे लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.

४० टक्के निर्यातशुल्क लागू करणे म्हणजेच निर्यात बंद करण्यासारखेच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टाने पिकविलेल्या कांद्याचा उत्पादन खर्चही निघणार नाही.

आधीच अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना केंद्र सरकारच्या ४० टक्के उत्पादन शुल्क वाढीच्या निर्णयामुळे शेतकऱ्‍यांच्या आत्महत्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा व मालेगाव या तीन तालुक्यांमध्येच केवळ आठ दिवसात उच्च प्रतीचा दोन लाख टन कांदा विक्रीस येतो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एनसीसीएफ व नाफेड मार्फत सरसकट किमान तीन हजार रुपये प्रतिक्विंटल कांदा खरेदी करण्यात यावा. तरच शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ येतील.

यावर त्वरित निर्णय घेण्यात यावा अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. कोरोना काळात शेती व्यवसायाच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांनी देशाची अर्थव्यवस्था सावरली होती.

आज शेतकरी संकटात असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहाण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे असलेल्या कांदा सरसकट तीन हजार रुपये रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्याची आग्रही मागणीही माजी आमदार सौ.चव्हाण यांनी निवेदनात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT