नाशिक : राज्य शासनाच्या मुद्रांक व नोंदणी विभागाकडून ऑनलाइन दस्त नोंदणीसाठी विशेष पोर्टल बनविण्यात आले आहे. शासकीय कार्यालयात दस्त नोंदणीसाठी जाण्याची आता आवश्यकता नाही. (Direct Stamp Registration from Builders Office Nashik News)
नाशिक शहरातील पहिला ई- रजिस्ट्रेशन दस्त नोंद सम्राट ग्रुपमध्ये नोंदविला गेला त्यानंतर दुसरा ई-रजिस्ट्रेशन दस्त नोंदणी नरेडकोचे सभासद जयेश ठक्कर व भाविक ठक्कर यांच्या शिल्पा आनंदवन या गृहप्रकल्पात नोंदविला गेला.
मुद्रांक व नोंदणी विभाग, नाशिक जिल्हा व नरेडको नाशिक यांच्या एकत्रित पुढाकाराने शिल्पा इस्टेट यांच्या शिल्पा आनंदवन या गृहप्रकल्पात बुकिंग होऊन ऑनलाइन ई-रजिस्ट्रेशन करण्यात आले.
शिल्पा इस्टेट ऑफिस, होलाराम कॉलनी या कार्यालयात नोंदणीसाठी मुद्रांक जिल्हाधिकारी, कैलास दवंगे व तांत्रिक विभाग अधिकारी देविदास कोल्हे तसेच, ई-रजिस्ट्रेशन नोंदणीवेळी दस्त नोंदणी करणारे शुभम चौधरी, वैभवी चौधरी उपस्थित होते.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
दस्त नोंदणीसाठी मुद्रांक कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसून अगदी शासकीय सुट्टी असलेल्या दिवशी दस्त नोंदणी होणार आहे. राज्य शासनाच्या मुद्रांक व नोंदणी विभागाच्या वतीने ऑनलाइन दस्त नोंदणीसाठी विशेष पोर्टल बनविण्यात आलेले आहे.
या प्रणालीत दहा मिनिटांच्या आत दस्त नोंदणी होते. नरेडको नाशिकचे सुनील गवादे, शंतनू देशपांडे, भाविक ठक्कर, राजेंद्र बागड, पुरुषोत्तम देशपांडे, आश्विन आव्हाड, परेश शाह, हर्ष केडिया, लौकिक तातेड, युनियन बँक अधिकारी, भूषण राणे, रोहित शाह, मनोज भारती, मयूर आवारे, योगिता सानप, विजय सुराणा, सुशील देशपांडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.