chhagan bhujbal1.jpg 
नाशिक

मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी दिशा देणारा अर्थसंकल्प - छगन भुजबळ

सकाळवृत्तसेवा

नाशिक : अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प सामान्य माणसाला अपेक्षित असलेला अर्थसंकल्प असून, मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी राज्याला दिशा देणारा आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. तसेच, कृषीसाठी तीन हजार 254 कोटींची तरतूद, शेतीला दिवसा वीजपुरवठ्या साठी सौरपंप, मुख्यमंत्री जलसंवर्धन, शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ यामुळे कृषी क्षेत्राला चालना मिळणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी म्हटले.

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

श्री. भुजबळ म्हणाले, की महिला सुरक्षेला प्राधान्य दिले. पायाभूत सुविधांना भरीव मदत केली. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतःच्या खर्चातून शेतकऱ्यांना मदत केली. राज्यात दररोज रोज एक लाख शिवभोजन थाळ्या देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. पाचशे थाळ्या केंद्रांवर देण्यात येतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी चिंतामुक्त करण्यासाठी आम्ही पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांना मदत करत असताना प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करताना या योजनेसाठी दोन हजार 34 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केल्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जलसंवर्धन आणि ठिबक प्रोत्साहनाची मदत होईल. शिवाय रेशीम उद्योगाला चालना, काजू फळपिकावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला चालना याचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला. शेततळे व शेततळ्यांच्या अस्तरीकरणाला निधी उपलब्ध होणार आहे, असे श्री. भुसे यांनी सांगितले. 

बेरोजगारी दूर करण्याचा आशावाद 

अर्थसंकल्प राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी आशादायी असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, की उद्योगांना आवश्‍यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून ई-कॉमर्स, टेक्‍स्टाइल, फिनटेक क्षेत्राचे तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही योजना लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारी, निमसरकारी आस्थापनांसाठी निधी दिला जाणार असून, या योजनेसाठी सहा हजार कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी 15 ते 35 टक्के अनुदान देण्यात येत असून, यातून एक लाख उद्योग घटक निर्माण होणार आहेत. 

सर्वसमावेशक अर्थसंकल्प 

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार म्हणाले, की महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून, सर्व घटकांना आशादायी आहे. शेतीसोबत जोडधंद्यांना पाठबळ देऊन शेतकरी बांधवांना सक्षम करण्याचा प्रयत्न होत आहे. शिवाय राज्यातील गड व किल्ले यांच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याने तरुण पिढीस शिवस्वराज्यातील गड व किल्ले अनुभवता येतील. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT