Dam water discharge latest marathi news esakal
नाशिक

Nashik : पावसाची उघडीप अन् 21 धरणांमधून विसर्ग

महेंद्र महाजन

नाशिक : आदिवासी भागाचा अपवाद वगळता सतत कोसळणाऱ्या पावसाने (Rain) आज शहर आणि जिल्ह्याच्या इतर भागामध्ये उघडीप दिली. मात्र आजवरच्या पावसामुळे नाग्यासाक्या, पूनंद, माणिकपूंज वगळता इतर २१ धरणांमधून (Dam) विसर्ग (Discharge) करण्यात येत होता.

जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत दुप्पटीहून अधिक पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी ७२.१ टक्के पावसाची नोंद झाली होती, तर मोठ्या व मध्यम २४ धरणांमध्ये ४२ टक्के जलसाठा होता. (discharge from 21 dams after decreasing rainfall nashik Latest Marathi News)

जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासापर्यंत १५१.९ टक्के पावसाची नोंद झाली असून धरणसाठा ८३ टक्के ठेवण्यात आला आहे. गंगापूर धरणातून ३ हजार ४८६, मुकणेतून ७१७ क्यूसेस विसर्ग सुरु होता.

तो सायंकाळी बंद करण्यात आला आहे. मात्र आळंदीतून ६८७, वालदेवीतून ३४१, कडवामधून १ हजार ३९६, भोजापूरमधून ४५० क्यूसेस विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे. नांदूरमधमेश्‍वरमधील विसर्ग २८ हजार ९३० वरून २० हजार ७७६, तर दारणामधून ७ हजार २४४ वरून ४ हजार ३४०, पालखेडमधून ६ हजार ८४८ वरून ३ हजार ८ क्युसेसपर्यंत कमी करण्यात आला होता.

इतर धरणांमधून सुरु ठेवण्यात आलेला विसर्ग क्युसेसमध्ये असा : कश्‍यपी-८००, गौतमी-गोदावरी-५००, करंजवण-३ हजार ८३०, वाघाड-१ हजार ८३५, ओझरखेड- १ हजार ६७६, पुणेगाव-१ हजार २०९, तिसगाव-११०, भावली-४८१, चणकापूर-७ हजार ९५८, हरणबारी-१ हजार २२२, केळझर-३८८, गिरणा-४ हजार ७५२. आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर मधील साठा १०० टक्के ठेवण्यात आला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये ६७, गिरणामध्ये ९१ टक्के जलसाठा आहे.

तालुकानिहाय झालेल्या पावसाची टक्केवारी

मालेगाव-१७५.४

बागलाण-१८३.९

कळवण-२४५.९

नांदगाव-१४२.८

सुरगाणा-१९४.१

नाशिक-१५५.४

दिंडोरी-३०६.५

इगतपुरी-७७.५

पेठ-२२१.२

निफाड-२००.२

सिन्नर-१२४.३

येवला-१२९.५

चांदवड-२१७.१

त्र्यंबकेश्‍वर-१२६.३

देवळा- २१२.३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT