Nashik Police Transfer: गेल्या महिन्यात मद्यविक्रीतून कंपनीची सुमारे १० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यातील मुख्य संशयिताला पोलिसांनी ठाणे शहरातून अटक केली होती; परंतु हा संशयित ठाण्यातील वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या ‘जवळकी’तील असल्याने अवघ्या काही तासांत त्यास ‘मुक्त’ करण्याची वेळ नाशिक पोलिसांवर ओढवली होती.
या प्रकरणात दुसरीकडे फसवणूक झालेली मद्य कंपनी जळगाव जिल्ह्यातील वजनदार माजी आमदाराची होती. (discussion about alcohol company connection Behind transfer of Police Commissioner nashik news)
त्यांचे वरिष्ठ पातळीवर संपर्कसूत्र असल्याने त्यांनी या प्रकरणी दबाव आणला. अखेर या प्रकरणात पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे. मद्य प्रकरण घडल्यावर गृह मंत्रालयातील वरिष्ठ पातळीवरून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना आल्या होत्या; परंतु फिर्यादी आणि आरोपी या दोघांचे वरिष्ठ पातळीवरील कनेक्शन पाहता नाशिक पोलिस अडचणीत आले होते.
या सगळ्याचे पर्यवसान पोलिस आयुक्तांची बदली होण्यात झाले आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची तडकाफडकी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी चार दिवसांपूर्वी बदली करण्यात आली. पुण्याचे सहआयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
शिंदे यांना पदभार स्वीकारून अवघे ११ महिने झाले होते. कार्यकाळ पूर्ण नसताना त्यांची तडकाफडकी बदलीमागे वरील कारण असल्याचे समोर येत आहे. गेल्या ११ ऑक्टोबरला गंगापूर पोलिस ठाण्यात मद्यविक्री करणाऱ्या एका कंपनीच्या व्यवस्थापकासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
शहरातील तीन मद्यविक्री दुकानांच्या व्यवहारांची जबाबदारी संशयितावर असताना त्याने दुकानचालकांकडून कोरे धनादेश घेत ते मद्य कंपनीत जमा न करता स्वत:सह कुटुंबीयांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही मद्य कंपनी जळगाव जिल्ह्यातील वजनदार माजी आमदाराची आहे. ते वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कातील आहेत. या गुन्ह्याचा तपास नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केला आणि मुख्य संशयिताला ठाण्यातून अटकही केली.
मात्र, मुख्य संशयितही राजकीय नेत्यांच्या संपर्कातील असल्याने पोलिसांवर दबाव आला. त्यास तत्काळ सोडावे लागले. या प्रकरणावरून आयुक्तांना दोन शब्द ऐकूनही घ्यावे लागले. या प्रकरणामुळे आयुक्त शिंदे यांची बदली झाल्याची चर्चा सध्या पोलिस आयुक्तालयात सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.