diseases  Google
नाशिक

मालेगावात साथीच्या आजाराचे थैमान

राजेंद्र दिघे

मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : कोरोनाची पाठ फिरत नाही तोच, शहरातील चर्चगेटसह काही भागात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून चर्चच्या पाठीमागील परिसरातील राधाकृष्ण कॉलनी, औंदुबर कॉलनी, प्रभातनगर, भाग्योदय कॉलनी, महादेव मंदिर परिसरातील अनेक वसाहतींमध्ये पोटदुखी, जुलाब, फ्लूसदृश लक्षणांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. मालेगावात दूषित पाणीपुरवठा कारणीभूत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. diseases like stomach ache diarrhea and flu are spreading in malegaon

सुरवातीला गढूळ व जंत असलेले पाणी येत असल्याचे अनेक कुटुंबीयांनी सांगितले. एकेका कुटुंबातील चार-पाच जण पोटदुखी व जुलाबाने त्रस्त झाल्याने अनेक जागरूक नागरिकांना जंत असलेल्या पाण्याचे नमुने घेतले आहेत. पाणीपुरवठा विभागाने गळतीबाबत तातडीने उपाययोजना करून गळती थांबवावी. बरेचदा गळती बंद केल्यानंतर त्याच जागी पुन्हा पाणी गळती होते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाजवळ अशीच गळती थांबवण्यात आली, तेथून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. गळतीसह पाणीपुरवठ्यासंदर्भात त्या भागातील पाणीपुरवठा कर्मचारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

‘सकाळ'ने वेधले लक्ष

शहरातील वाढत्या वसाहती पाहता जलवाहिन्या गळतीकडे दुर्लक्ष होते. अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या गळतीने साचलेल्या डबक्यात मोकाट जनावरे, डुकरे, कुत्री यांचा वावर असतो. परिणामी पाणी दूषित होत असते.नागरिकांच्या तक्रारींकडे कानाडोळा होतो. याच भागातील स्वामी समर्थ कॉलनीतील गळतीबाबत सकाळने मे महिन्यात वृत्त प्रसिद्ध केले होते.

वारंवार जलवाहिन्यांची गळती हेच दूषित पाण्यास कारणीभूत आहे. आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आहेत. महापालिका प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन शुद्ध पाणीपुरवठा करावा.

- मनोज सूर्यवंशी, नागरिक, राधाकृष्ण कॉलनी.

नागरिकांनी पाणी उकळून माठ भरावा. स्वच्छ व जाड कापडाने पाणी गाळून प्यावे. लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावे.

- डॉ. प्रशांत काकळीज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT