Hindu-Muslim Unity esakal
नाशिक

घोटीत एकमेकांप्रति आदरभाव, सामाजिक ऐक्याचे प्रदर्शन

गोपाळ शिंदे

घोटी (जि. नाशिक) : महाराष्ट्रात सद्या भोंग्यांचा सुरू असलेल्या वाद-विवादाला (Bhonga Controversy) घोटीत चपराक बसल्याचे दिसून आले. जामा मशीद येथे बुधवार (ता. ४ ) सकाळी अकराला महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS), पोलिस व ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांत महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत दोनही समाजाने सामाजिक परिवर्तनाचा वारसा जपताना एकमेकांप्रति आदरभाव दाखवत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. (display of social unity by Hindu Muslim in ghoti Nashik News)

सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी दोनही समाजातील ज्येष्ठ नागरिक व युवकांना एकत्रित घोटी पोलिस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी बैठक घेत गावात कोणत्याही प्रकारचा सामाजिक ताणतणाव होणार नाही, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व मुस्लिम समाजातील पदाधिकारी यांची जामा मशीदमध्ये बैठक घेतली.

बैठकीपूर्वीच मुस्लिम समाजाने पहाटेची अजान बंद करून दिलदारपणा दाखविला. याचे कौतुक करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे यांनी कोणत्याही परिस्थितीत घोटी शहरातील सामाजिक ऐक्य भंग पावणार नाही, यासाठी महत्त्वपूर्ण समन्वय साधून शहराचा मागील इतिहास व धार्मिक कार्यक्रमातील दोन्ही समाजाने एकमेकांना केलेली मदत याचे अनेक उदाहरणे देत मुस्लिम समाजाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करतानाच इतरही शहरात घोटीचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.

दरम्यान, जामा मशिदीचे ट्रस्टी डॉ. युनूस रंगरेज यांनी देखील गावात वाद जर भोंग्यांवरून होणार असेल, तर ती आपली संस्कृती नाही. म्हणून रात्रीच मुस्लिम समाजाची बैठक घेत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केल्यास समाज पाठराखण करणार नाही, असे ठणकावून सांगितले होते. यामुळे बैठकीत सुरवातीलाच सर्वांत समन्वय दिसून आल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदर करून कायदा सुव्यवस्था अबाधित राखून घोटी शहरवासीयांनी देशात एकतेचा संदेश दिल्याची भावना व्यक्त केली.

या वेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे, जामा मशिदचे ट्रस्टी डॉ. युनूस रंगरेज, शाही मशिदचे ट्रस्टी मुस्ताक पानसरे, घोटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर, मनसेचे शहराध्यक्ष नीलेश जोशी, अर्जुन कर्पे, राजेंद्र राखेचा, हृषी शिंगाडे, नीलेश बुधवारे, सचिन छत्रे, नजीर पानसरे, बशीर रंगरेज, न्याजू रंगरेज, अन्वर पानसरे, कलीम शेख, मोहमद शेख, मोमीन तांबोळी, नासिर मणियार यांसह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT