Department of Tribal Development esakal
नाशिक

Nashik News : आदिवासी विभागात प्रतिनियुक्तीवरून अधिकाऱ्यांमध्ये पेटला वाद

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आदिवासी विकास विभागाचे अमरावती अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांची प्रशासकीय कारणास्तव यवतमाळ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या सहआयुक्तपदी बदली करण्यात आली.

वान‌खेडे यांच्या रिक्त जागी प्रतिनियुक्तीने साताऱ्याच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक चंचल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (dispute broke out between officials over deputation in tribal department Nashik News)

दरम्यान, राज्यात आदिवासी विकास विभागाचे चार अपर आयुक्त आहेत. १९९२ च्या शासन निर्णयानुसार भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी यांच्यामधून, तसेच आदिवासी विकासमधील सेवा ज्येष्ठतेनुसार प्रत्येकी दोन अपर आयुक्त भरावयाची आहेत.

सद्यःस्थितीत ठाणे व नागपूर येथे आयएएस, तर नाशिक व अमरावती येथे आदिवासी विकास सेवेतील अधिकारी कार्यरत होते. अमरावती अपर आयुक्तांच्या बदलीने विभाग -प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांमध्ये वाद पेटला आहे.

आदिवासी विकास विभागात वर्ग-१ व वर्ग-२ दर्जाची अनेक पदे असून, त्यासाठी स्वतंत्र सेवाशर्तीचे नियम आहे. दैनंदिन कामकाजासाठी अनेकदा विभागातील अधिकाऱ्यांना सेवाशर्तीचे नियम डावलून अन्य विभागातील अधिकाऱ्यांना नियुक्ती दिली जात आहे.

त्याचा प्रत्यय अमरावती अपर आयुक्त बदलीत दिसून आला आहे. कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच वानखेडे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

बदलीला विरोध

पाटील यांच्या नियुक्तीला आदिवासी विकास विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. ही बाब आदिवासी सेवेतील अधिकाऱ्यांवर अन्यायकारक असल्याचा आरोप आदिवासी विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने केला आहे.

अमरावतीप्रमाणेच अपर आयुक्त (मुख्यालय), तसेच घोडेगाव आणि राजूर प्रकल्प अधिकारी पदावर इतर विभागातून प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या नेमणुकांमुळे विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या नेमणुका तत्काळ रद्द करण्याची मागणी संघटनेने केली.

विविध मागण्यांचे निवेदन अपर मुख्य सचिव प्रदीपकुमार व्यास यांना देण्यात आले. या वेळी नाशिकचे अपर आयुक्त संदीप गोलाईत, किरण माळी, संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पोळ, उपाध्यक्ष संतोष ठुबे, सुदर्शन नगरे, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT