Wheel drums given to the women here by the organization 'Wells on Wheels' at ghanicha wada esakal
नाशिक

महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली! घाणीचा पाडा येथे Wells on Wheels संस्थेकडून 28 वॉटर व्हील ड्रमचे वाटप

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव (जि. नाशिक) : घाणीचा पाडा (ता. सुरगाणा) येथील आदिवासी बांधवांसाठी ‘वेल्स ऑन व्हील्स’ या संस्थेकडून २८ वॉटर व्हील ड्रमचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या या दायित्वामुळे आदिवासी भागातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हंडा ठेवण्याची वेळ आता येणार नाही. (Distribution of 28 water wheel drums by Wells on Wheels organization at Ghanicha Pada nashik news)

महाराष्ट्र - गुजरात सीमेवरील अति दुर्गम पाड्यांवर पिण्याची पाण्याची नियमित टंचाई असते. घाणीचा पाडा हे गाव अति दुर्गम क्षेत्रात मोडते, गावामध्ये प्राथमिक सोयी सुविधांचा अभाव आहे. उन्हाळ्यात गावाला भीषण पाणी टंचाई जाणवत असते. अशा वेळी गावातील महिला, मुले, विद्यार्थी हे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत असतात. त्यामुळे येथील शालेय विद्यार्थी यांना शाळेत जाण्यास जमत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होते होते.

मुलींनी शिक्षण घेत असताना वेळ वाया जाऊ नये आणि गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट थांबली जावी आणि डोक्यावर हंडा कमी व्हावा या उद्देशाने वेल्स ऑन व्हील्स या संस्थेचे व्यवस्थापक नारायण गभाले यांनी गावाची पाहणी करुन गावाला ड्रम वाटप करण्याचे निश्चित केले. त्यानुसार मान्यवरांच्या उपस्थित व्हील ड्रमचे वाटप केले.

यावेळी लंडन येथील अनिवासी भारतीय मेघना व श्री. भाविन भट्ट, आणि त्यांच्या मुली हर्ष व इशा ‘वेल्स ऑन व्हील्स’ संस्थेच्या नेहा हरललका, श्वेता हरललका यांनी या भागात भेट दिली. यावेळी या मान्यवरांचे घाणीचा पाडा येथे आगमन झाल्याने येथील ग्रामस्थ यांनी आदिवासी संस्कृती जोपासत त्यांचे उत्साहात स्वागत केले. आदिवासी संस्कृतीची ओळख असलेल्या पावरी, तूर वाद्याचा चा ठेका पाहून पाहुण्यांनी देखील गावकऱ्यांच्या तालावर ताल मिळवत मनसोक्त नाचून आनंद साजरा केला.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

संस्थेचे संस्थापक शाझ मेनन यांच्या कृतिशील पुढाकाराने घाणीचा पाडा गावाला पाण्याचे वॉटर व्हील ड्रम वाटप करण्यात आले. भाविन भट्ट आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, " संस्थेच्या या उपक्रमामुळे मुलींना पाणी आणण्यासाठी जो जास्त वेळ जात होता तो वेळ वाचेल. महिलांच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. यावेळी त्यांनी संस्थेचे संस्थापक शाझ मेनन यांचे आभार मानले व कौतुक देखील केले.

या वेळी संस्थेचे अजय देवरे, नारायण गभाले, अनुप मोरे, विजय देवरे, स्वप्नील पाटील, संकेत बिडगर, निमिष उमरकर, स्वयंसेवक पवन, महादेव, ओम व गावातील जलपरिषद मित्र कांतिलाल सोनवणे, ग्रामस्थ, महिला आदी उपस्थित होते.

"संस्थेच्या या उपक्रमामुळे महिलांना पाणी आणण्यासाठी जो जास्तीचा वेळ लागतो तो यामुळे वाचेल. महिलांच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. मुलींना अभ्यासाकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल, आदिवासी संस्कृती संवर्धनासाठी यापुढेही मदत केली जाईल."

- भाविन भट्ट, डेंटिस्ट लंडन

"उन्हाळ्यात आमच्या गावाला भीषण पाणी टंचाई जाणवत असते. या वेळेस आम्हाला रात्री दूर दूरवर जंगलात झऱ्यावर पाणी शोधायला जावे लागते. यामुळे डोक्यावर हांडे घेऊन पाणी आणणे अवघड होते. यामुळे आमचे शारीरिक श्रम वाचतील माझ्या मुलींना डोक्यावर पाणी आणावे लागते. व्हील ड्रम मुळे वेळ वाचेल व अभ्यासाकडे लक्ष देता येईल."

- चंद्रकला पवार ( ग्रामस्थ, घाणीचा पाडा, सुरगाणा).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT