A letter from an elderly farmer to Sattar esakal
नाशिक

Nashik Agriculture Update : राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 15 दिवसात मदतीचे वाटप

सकाळ वृत्तसेवा

सातपूर : राज्यातील शेतकरी अनेक संकटावर मात करीत वाटचाल करीत असताना राज्य शासनाच्या वतीने वेळोवेळी मदत करण्यात येत आहे. यंदा अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ ढगफुटी यासारख्या अनेक संकटांनी शेतकरी हवालदिल झाला असून कोणताही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही, तसेच पीक विमाचे पैसे सर्वांना मिळतील यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

तसेच कृषीथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे., राज्यातील कृषी क्षेत्रात कार्यरत अन्य संस्थांनी याचा आदर्श घ्यावा, असेही अब्दुल सत्तार म्हणाले. (Distribution of aid to all farmers in State within 15 days Nashik News)

ठक्कर डोम येथे आयोजित ‘कृषीथॉन’ प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवसाच्या शनिवारी (ता.२६) पहिल्या सत्रात कृषी सेवा केंद्र पुरस्कार वितरण प्रसंगी कृषीमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी आमदार दिलीप बनकर, आमदार सीमा हिरे, नाडाचे उपाध्यक्ष अरुण मुळाणे, नाडाचे सचिव लक्ष्मीकांत जगताप, नाडाचे खजिनदार मंगेश तांबट, कृषी विभागाचे सहसंचालक मोहन वाघ, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक विवेक सोनवणे, चंद्रकांत ठक्कर, प्रभाकर पाटील, बापूराव पाटील, महेश हिरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल ढिकले आदी उपस्थित होते.

मंत्री सत्तार म्हणाले की, यंदा विविध प्रकारच्या नैसर्गिक संकटांसाठी सुमारे १२ हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या मदतीचे वाटप करण्यात येत आहे. येत्या १५ दिवसात सर्व मदतीचे वाटप करण्यात येईल.

प्रदर्शनाचे आयोजक साहिल न्याहारकर यांनी प्रास्ताविक केले. श्री. न्याहारकर आणि अश्विनी न्याहारकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. आदित्य तुपे यांनी सूत्रसंचालन तर हरीश मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमात पाहुण्यांच्याहस्ते आदर्श कृषी सेवा केंद्र पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

आदर्श कृषी सेवा केंद्र पुरस्कारार्थी असे

प्रभाकर पाटील (नाशिक), विष्णूपंत धुमाळ (दिंडोरी ), संजय निकम (मालेगाव), रावसाहेब माळोदे (निफाड), संदीप राजवळ (पिंपळगाव बसवंत ), भाऊसाहेब बिन्नर (घोटी ता.इगतपुरी), राजेंद्र मोरे (कळवण), गोविंदराव पाटील (नांदगाव), धनंजय निकम (मालेगाव), बस्तीराम थेटे (गिरणारे-नाशिक), विजय पाटील (पिंपळकोठे- सटाणा), बापू गुंजाळ (देवळा), शक्ती दळवी (लखमापूर- सटाणा), संजयशेठ उगले (फर्दापूर- सिन्नर), राजेंद्र काळे (चांदवड), राधिका वाकचौरे (अंदरसूल- येवला) तर नाडातर्फे महेंद्र बोरा (वणी), नितीन काबरा (येवला), विश्वास कवडे (नांदगाव), नरेंद्र मोरे (सटाणा) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

वयोवृद्ध शेतकऱ्याची सत्तारांना चिठ्ठी

कृषीथॉन प्रदर्शनात आलेल्या राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना कार्यक्रमातच जळगाव जिल्ह्यातील बाबाजी सोनवणे (वय ६५) या शेतकऱ्याने परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या कापूससह इतर पिकांची नुकसान भरपाई कधी मिळणार अशी चिठ्ठी लिहून विचारणा केली यावेळी सत्तारांनीही परतीच्या पावसाने नुकसान भरपाई येत्या महिन्याभरात खात्यात जमा होईल, असे आश्‍वासन देत आपलं सरकार हे लोकल गाडी सारखं आहे, हात दाखवा व गाडी थांबवा सर्वांना बरोबर घेऊन जाणार सरकार आहे, असे आपल्या खास शैलीत या चिठ्ठीला उत्तर दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT