PWD News esakal
नाशिक

Nashik News : बिलांचे ठराविक ठेकदारांनाच वाटप; इंजिनिअर्स असोसिएशनची अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सार्वजनिक बाँधकाम विभागात कामे होऊनही बिले मिळत नसल्याने आर्थिक कोंडीत सापडलेले ठेकेदार पुन्हा अडचणीत सापडले आहेत. झालेल्या कामांच्या बिलापोटी शासनाकडून २२.६३ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र, या निधीतून ठराविक ठेकेदारांची बिले काढण्याचा घाट घातला जात असून असमान वाटप केले जात असल्याची तक्रार महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन संघटनेने अधिक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे. (Distribution of bills to certain contractors only Complaint of maharashtra Engineers Association to Superintending Engineers Nashik News)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे, की दोन दिवसांपूर्वी शासनाकडून विभागास २२.६२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. परंतु हा निधी कामांप्रमाणे पाठवण्यात आलेला आहे असे समजते. निधी वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षपात झालेला आढळून येत असून फार त्रोटक निधी उपलब्ध झालेला आहे. निधी वाटपातील समाविष्ट कामे ही बरीचशी २०२१-२२ व २०२२-२३ मधील आणि विशिष्ट ठेकेदारांची आहेत.

तरी सर्व प्रलंबित बिले प्राप्त निधीमधून समप्रमाणात ज्यांची बिले जुने असतील, त्यांची आदी या क्रमाने मंजूर निधी वाटप व्हावा. कोणावरही अन्याय होणार नाही या पद्धतीने निधीचे वाटप व्हावे अशी मागणी संघटनेने निवेदनात केली आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष निसर्गराज सोनवणे, सरचिटणीस विनायक माळेकर, पदाधिकारी मिलिंद सैंदाणे, अनिल आव्हाड, चंद्रशेखर डांगे, प्रशांत देवरे, अजित सकाळे, सागर विंचू, संजय कडनोर आदींच्या स्वाक्षरी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT