District Bank auctioned 113 tractors seized sakal
नाशिक

नाशिक : जप्त ११३ ट्रॅक्टरांचा जिल्हा बँकेतर्फे लिलाव

४ फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वाहन व ट्रॅक्टर घेण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज घेत त्या कर्जाची वेळेत परतफेड न केल्याने थकबाकीदार यांच्याकडून जप्त केलेल्या ११३ ट्रॅक्टर यांचा लिलाव करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. चार फेब्रुवारी २०२२ पासून टप्प्या टप्प्याने जाहीर लिलाव होणार आहे. थकबाकीदारांनी कर्जाची परतफेड करत कारवाई टाळावी, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

नाशिक जिल्हा सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती अतिशय खराब झाली आहे. बँकेस दोन हजार कोटीची वसुली करायची असून यापैकी एक हजार ४५२ कोटी रुपये ही केवळ जुनी थकबाकी आहे. सदरची थकबाकी करण्याच्या उद्देशाने बँकेकडून कडक पावले उचलली जात आहे. याचाच एक भाग म्हणून ज्यांनी बँकेकडून वाहन व ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतले होते व ते वेळेत परत केले नव्हते, अशी थकबाकी देखील मोठी आहे. यामुळे बँकेने जिल्ह्यातील एकूण २३८ वाहने व ट्रॅक्टर जप्त केले आहे. यापैकी आता ११३ ट्रॅक्टर यांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय जिल्हा बँक प्रशासक यांनी घेतला आहे. चार फेब्रुवारीपासून जिल्ह्यात टप्प्या टप्प्याने या ११३ ट्रॅक्टर यांचा जाहीर लिलाव केला जाणार आहे. जिल्ह्यातील थकबाकीदार सभासदांनी अशा प्रकारची कटू कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा लवकरात लवकर करून बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक यांच्याकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील मोठे थकबाकीदार रडारवर

चालू वसुली हंगामात जास्तीत जास्त थकीत कर्ज वसुली होणेकामी व बँकेच्या खातेदारांना ठेवींची आणि खात्यावरील त्यांची बचतीची रक्कम उपलब्ध होण्यासाठी बँकेचे प्रशासक यांनी वसुलीचे सक्त आदेश दिले आहे. वसुलीच्या उद्देशाने मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदारांवर थकबाकीची कर्ज वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ चे नियम १०१ नुसार कारवाई करून वसुली केली जाणार आहे. यासाठी २०१६ पूर्वीच्या मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदार सभासदांच्या तालुकानिहाय याद्या तयार करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT