district collector Gangadharan D & team esakal
नाशिक

Nashik : भूसंपादनातील अडथळ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

संजीव निकम

नांदगाव/मनमाड (जि. नाशिक) : जळगाव ते मनमाडदरम्यानच्या १६० किलोमीटरवरील तिसऱ्या लाइनच्या कामाला गती मिळण्यासाठी लोहमार्गाच्या कामात निर्माण झालेले भूसंपादनातील (Land acquisition) अडथळे दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी डी. गंगाथरन (District Collector Gangatharan D) यांनी गुरुवारी (ता. ९) तालुक्यातील नागापूर-हिसवळ-नांदगाव व पिंपरखेड स्थानक परिसरात भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डी. गंगाथरन यांचा हा पहिलाच नांदगाव दौरा होता. (District Collector Gangatharan D inspects obstacles in land acquisition Nashik News)

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात तिसऱ्या लाइनचे काम संथगतीने सुरू असल्याने होणाऱ्या विलंबाबत रेल्वे बोर्डाकडून जळगाव व नाशिक येथील जिल्हाधिकारी पातळीवर पाठपुरावा होत असल्याने या कामांच्या पाहणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी तालुक्यातील रेल्वेस्थानकांच्या परिसरात भेट दिली. ज्या ठिकाणाहून तिसरी लाइन जाणार आहे त्यासाठी भूसंपादनानंतर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळण्याची हमी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिली. पानेवाडीजवळ अप साइडला असलेला दर्गा स्थलांतरित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्याने रूळ टाकण्याचा अडथळा त्यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात वाढलेल्या रेल्वे वाहतुकीवर पर्यायी व्यवस्था म्हणून सध्याच्या मुख्य दोन लोहमार्गांखेरीज अन्य तिसऱ्या लोहमार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने चार वर्षांपूर्वी मंजुरी दिली. त्यानंतरदेखील हे काम पुढे सरकत नाही. या प्रकल्पाची सुरवातीची किंमत एक हजार १०० कोटी होती. त्यात आता विलंबामुळे वाढ झाली आहे. या वेळी येवल्याच्या प्रांताधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, रेल्वेचे उपमुख्य अभियंता सक्सेना, नागराळे आदी उपस्थित होते.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी नव्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात तालुक्यातील विविध खातेप्रमुखांच्या बैठकीचा आढावा घेतला. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या. एकाच छताखाली कार्यालये आणूनही भूमी अभिलेख कार्यालय अद्याप स्थलांतरित झाले नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी भूमी अभिलेखसह जी अन्य कार्यालये स्थलांतरित झाली नसतील त्यांचे स्थलांतर लवकर करावे, असे निर्देश संबंधित खातेप्रमुखांना दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT