district First solar powered flour mill started by Dari Gram Panchayat nashik news esakal
नाशिक

Nashik News : दरी ग्रामपंचायतीने सुरू केली सौरउर्जेवर चालणारी पहिली पीठ गिरणी!

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारप्राप्त झालेल्या नाशिक तालुक्यातील दरी ग्रामपंचायतीने सौरउर्जेवर चालणारी पिठाची गिरणी सुरू केली.

पुरस्कारांच्या आठ लाख रकमेतून सुरू केलेली सौरउर्जेवरील पिठाची गिरणी जिल्ह्यातील पहिली गिरणी आहे. ग्रामपंचायतीने उभारलेली ही गिरणी आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबाला चालवायला दिली असून, गावातील लोकांना अल्प दरात दळण उपलब्ध होईल. (district First solar powered flour mill started by Dari Gram Panchayat nashik news)

नाशिक तालुक्यातील पेसा अंतर्गत असलेले दरी गाव. या गावाची लोकसंख्या २०११ आहे. निर्मल ग्राम पुरस्कारप्राप्त, पर्यावरण विकासरत्न, अस्पृश्यता निवारणार्थ प्रथम क्रमांकाचे प्रशस्तीपत्र, महात्मा गांधी तंटामुक्त प्रथम क्रमांकाचे पारितोषिक गावाला प्राप्त झाले असून, कुपोषणमुक्त गाव म्हणूनही जाहीर झाले आहे.

गेल्या वर्षीच केंद्रस्तरावरचा महत्त्वाचा समजला जाणारा पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारप्राप्त दरी ग्रामपंचायतीस प्राप्त झाला आहे. या पुरस्कारांतर्गत आठ लाखांची रक्कम ग्रामपंचायतीला मिळाली. या निधीतून ग्रामपंचायतीने सौरउर्जेवर चालणारी गिरणी तसेच गाव व प्राथमिक आरोग्य केंद्र, माध्यमिक शाळा यांना जोडणारा अत्यंत गरजेचा लोखंडी पूल ही दोन कामे केली आहेत.

गावात सतत वीज गायब होत असते, त्यामुळे २४ तास चालणारी गिरणी चालविली जावी, हा विचार पुढे आला. यातून ग्रामपंचायतीने ही गिरणी उभारली. यासाठी आठ लाख ५० हजार रुपयांचा खर्च आला आहे. सदर गिरणी ग्रामपंचायतीने उभारलेली असली, तरी ती एका कुटुंबास चालविण्यासाठी दिली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जेणे करून कुटुंबातील महिलेला आर्थिक आधार मिळेल, तसेच या कुटुंबाचे मजुरीसाठी होणारे स्थलांतर थांबविण्यात येईल. २४ तास चालणाऱ्या या गिरणीतून ६० टक्के उत्पन्न ग्रामपंचायतीस प्राप्त होईल. याशिवाय, गिरणीतून दळणाचे दर हेही कमी (साधारण अडीच ते तीन रुपये इतके) ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गावातील लोकांना कमी दरात दळण दळून मिळेल.

ग्रामपंचायतींकडून सौरउर्जेवर गिरणी सुरू करणारी दरी ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. या गिरणीचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, सर्व सोयी-सुविधांयुक्त असे सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्‍घाटनही या वेळी करण्यात आले.

‘हिरवा श्वास एक लाख’ या अंतर्गत दरी ग्रामपंचायत (म.ग्रा.रो.ह.यो.) व राह फाउंडेशन (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२३-२४ मध्ये दरी येथे ६३ हजार ५३० वृक्षलागवडीचा प्रारंभही या वेळी करण्यात आला.

या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, गटविकास अधिकारी, डॉ. सारिका बारी, सरपंच अलका गांगोडे, उपसरपंच भावराव आचारी आदी उपस्थित होते.

"ग्रामपंचायतींनी यापूर्वी अनेक उपक्रमांतून पुरस्कार मिळविले आहेत. सौरउर्जेवर चालणारी पहिली गिरणी सुरू करून दरी ग्रामपंचायतीने आदर्श उभा केला. दरी येथे भविष्यात ऑक्सिजन पॉकेट तयार व्हावे, यासाठी काम करीत आहे." - आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

"ग्रामपंचायतीने सौरउर्जेवर २४ तास चालणारी गिरणी सुरू केली असून, यातून अल्पदरात दळून मिळणार आहे. यात एका कुटुंबास रोजगारही उपलब्ध झाला. गावात रोजगार निर्मितीसाठी ग्रामपंचायतींचा भर राहणार आहे." - सचिन पवार, ग्रामसेवक, दरी ग्रामपंचायत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT