Election News esakal
नाशिक

Bank Election : छाननीत 122 अर्ज वैध, आता लक्ष माघारीकडे; छाननीत 3 अर्ज बाद

सकाळ वृत्तसेवा

Bank Election : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रीया सुरू झाली असून दाखल झालेल्या अर्जांची सोमवारी (ता.५) छाननी झाली. यात केवळ तीन अर्ज बाद ठरले असून, १२२ अर्ज वैध ठरले आहेत.

यात सर्वसाधारण गट ५७, तालुका प्रतिनिधी गट ३०, महिला राखीव गट ८, इतर मागास प्रवर्ग ८, अनु. जाती/जमाती गट ८ तर, विमुक्त जाती भटक्या जमाती गटातील ११ उमेदवारांचा समावेश आहे.

मंगळवारी (ता.६) अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून, ६ ते ९ जून हा कालावधी हरकतींसाठी असणार आहे. २० जून ही माघारीचा अंतिम दिवस असणार आहे. (District Government and Council Staff Bank Election 122 applications valid under scrutiny now focus on withdrawal nashik news)

बँकेचे एकूण सभासद १३ हजार २४० असून २१ जागांसाठी बँकेची निवडणूक प्रक्रीया सुरू आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. २१ जागांसाठी एकूण १६० अर्ज प्राप्त झाले असून २५९ अर्जाची विक्री झाली होती.

प्राप्त झालेल्या अर्जाची सोमवारी निवडणूक अधिकारी गौतम बलसाने यांच्या उपस्थितीत छाननी झाली. यात केवळ तीन अर्ज बाद ठरले आहे. सूचकाची स्वाक्षरी नसणे, प्रतिज्ञापत्रक भरले नसल्याने कारणाने हे अर्ज बाद झाले आहेत.

त्यामुळे १२२ अर्ज वैध ठरले आहे. वैध नामनिर्देशन पत्रांची यादी मंगळवारी निवडणूक कार्यालयात प्रसिद्ध होईल. ६ जून ते २० जून या कालावधीदरम्यान उमेदवारांना सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान निवडणूक कार्यालयात माघार घेता येणार आहे.

माघारीनंतर अंतिम यादी २१ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना निशाणीचे वाटप केले जाईल. २ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अन धाकधूक झाली कमी

अर्ज दाखल केल्यानंतर १ फेब्रुवारीपर्यंत थकबाकीदार असलेल्या सभासदांची यादी निवडणूक अधिकारी यांनी बॅंकेतून मागविली होती. ही यादी बॅंकेकडून सादर करण्यात आली. १ फेब्रुवारीपर्यंत थकबाकीदार असलेल्यांचे अर्ज बाद होणार असल्याच्या चर्चेने शनिवारी (ता.३) बॅंकेत उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती.

हे थकबाकीदारांचे अर्ज बाद ठरणार असल्याने, अनेकांनी या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी केली होती. याची ओरड झाल्यानंतर, सोमवारी सकाळी बॅंकेकडे ३ जून पर्यंत थकबाकीदार असलेल्या सभासदांची यादी मागविली गेल्याने उमेदवारांची धाकधूक कमी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT