Primary Health Center Building at Kapaleshwar.  esakal
नाशिक

Nashik News : व्यसनी वैद्यकीय अधिकाऱ्याचे निलंबन करा; ‘डीएचओ’ डॉ. मोरे यांच्याकडून चौकशी अहवाल सादर

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कपालेश्वर (ता. बागलाण) प्राथमिक आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी डॉ. वीरेंद्र आवारे हा मद्यधुंद अवस्थेत काम करीत असल्याचे निष्पन्न झाले असून, आरोग्य केंद्रातच त्याने मद्यपान केल्याचे समोर आले आहे.

डॉ. आवारे याचा निलंबनाचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्यात यावा, तसेच त्याची खात्यांतर्गत चौकशी करावी, अशी शिफारस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी केली आहे. (District Health Officer recommend to suspension of addicted medical officer nashik news)

कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत असताना प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला दाखल करून न घेता महिलेसह तिच्या वडिलांना हुसकावून लावल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकाराची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गंभीर दखल घेतली होती.

मित्तल यांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोरे यांना दिले. त्यानुसार तातडीने डॉ. मोरे यांनी संबंधित आरोग्य केंद्राला भेट देऊन चौकशी केली. या वेळी येथील ग्रामस्थांशीही त्यांनी संवाद साधला होता. त्यानंतर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोरे यांनी चौकशी अहवाल शुक्रवारी (ता. २५) उशिराने मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांना सादर केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यात प्रामुख्याने वैद्यकीय अधिकारी हा मद्यधुंद अवस्थेत काम करीत असल्याचे उघड झाले. तसेच, २२ ऑगस्टला रात्री अकराच्या सुमारास प्रसूतीसाठी आलेल्या कल्पना भोये (रा. खडकी, ता. कळवण) या महिलेला रुग्णालयात दाखल करून न घेता डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला असल्याचेही निष्पन्न झाले.

चौकशीअंती संबंधित अधिकाऱ्याने केंद्रातच मद्यपान केल्याचेही पुरावे हाती आले आहेत. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकारी दोषी असल्याचे अहवालात नमूद केले आहे. तसेच, संबंधित अधिकाऱ्याबाबत ग्रामस्थांकडून असलेल्या विविध तक्रारीही मांडण्यात आलेल्या आहेत. अशा दोषी अधिकाऱ्याचा निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. डॉ. मोरे यांनी अहवाल सादर केला असून, यावर आता मित्तल काय निर्णय घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT