election news  esakal
नाशिक

District Labor Federation Election : येवल्यात भुजबळ-दराडे, तर सिन्नरमध्ये कोकाटे-वाजे सामना

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग खुला झाला असून, पुढे ढकलण्यात आलेल्या नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन निवडणुकीसाठी मतदान, मतमोजणीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. मजूर संस्थेसाठी २५ डिसेंबरला मतदान होणार असून, २६ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (District Labor Federation Election Bhujbal Darade in Yevla Kokate Waje match in Sinner Nashik News)

ग्रामपंचायतच्या निवडणुकांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने गेल्या महिन्यात घेतला. यामुळे नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ४ डिसेंबरला मतदान होऊन मतमोजणी होणार असताना २९ नोव्हेंबरला शासनाने निवडणूक आहे, त्या टप्यावर स्थगित केली होती. मात्र, औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या याचिका सुनावणीत खंडपीठाने ही स्थगित उठविली. जिल्हा मजूर संस्थेच्या आठ तालुक्यांत एक-एकच उमेदवार शिल्लक राहिल्याने या तालुका संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे.

सात तालुका प्रतिनिधी संचालकांसह जिल्हास्तरावरील पाच अशा एकूण १२ जागांसाठी आता ३६ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हास्तरावरील पाच राखीव जागांपैकी महिला गटात दोन जागांसाठी दीप्ती पाटील, अनिता भामरे व कविता शिंदे, इतर मागासवर्गीय प्रवर्ग गटात पवन अहिरराव, अर्जुन चुंभळे, संदीप थेटे, मिलिंद रसाळ, अनुसूचित जाती-जमाती गटात शशिकांत उबाळे, हेमंत झोले, किरण निरभवणे, उत्तम भालेराव, रविकांत भालेराव, अशोक रोकडे, तर भटक्या विमुक्त जाती-जमाती गटात राजाभाऊ खेमनार, अप्पासाहेब दराडे, सुदर्शन सांगळे, सुरेश देवकर, बन्सीलाल कुमावत यांच्यात लढत होत आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

येवला आणि सिन्नर तालुका संचालक पदाची निवडणूक यंदा प्रतिष्ठेची असणार आहे. येवल्यामध्ये सविता धनवटे व मंदा बोडके यांच्यात लढत होत असली, तरी यामागे माजी मंत्री छगन भुजबळविरुद्ध आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे असा सामना होत आहे. धनवटे यांच्यामागे भुजबळ यांनी ताकद लावली आहे, तर बोडके यांच्यासाठी दराडे, संभाजी पवार, माणिकराव शिंदे हे त्रिमूर्ती एक झाले आहेत. सिन्नरमध्येही आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांच्याविरुद्ध दिनकर उगले अशी सरळ लढत होत आहे.

मात्र, उगले यांच्यासाठी आमदार कोकाटे, तर भारत कोकाटे यांच्यासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे रिंगणात उतरले आहेत. चांदवडमध्ये शिवाजी कासव यांच्यासाठी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल व शरद आहेर यांच्यासाठी भाजपचे डॉ. आत्माराम कुंभार्डे रिंगणात उतरले असून, त्यांनीही प्रतिष्ठा पणाला लावली आहे. १२ जागांसाठी २५ डिसेंबरला सकाळी आठ ते चार या वेळात क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मतदान होणार आहे, तर २६ डिसेंबरला सकाळी आठपासून काशीमाळी मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT