Election esakal
नाशिक

District Onion Potato Union Election: हिरे बंधूंसह डोखळे, गुळवे, कुंभार्डे दिग्गजांचे अर्ज बाद

सकाळ वृत्तसेवा

District Onion Potato Union Election: जिल्हा कांदा-बटाटा उत्पादक सहकारी संघाची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, प्राप्त झालेल्या अर्जांची गुरुवारी (ता. ३०) छाननी झाली. यात १०५ अर्जांपैकी तब्बल ३० अर्ज विविध कारणांनी बाद झाले आहेत.

बाद झालेल्या अर्जांमध्ये प्रामुख्याने संस्था सोसायटी गटातील अपूर्व हिरे, अद्वय हिरे, राजेंद्र डोखळे, अॅड. संदीप गुळवे, डॉ. आत्माराम कुंभार्डे, राजाभाऊ खेमनार, गुणवंत होळकर या दिग्गजांचा समावेश आहे.

सोसायटी गटात अर्ज बाद झालेले असले, तरी यातील बहुतेकांनी ओबीसी गटात अर्ज दाखल केलेले असल्याने, आता गटासाठी मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. (District Onion Potato Union Election Applications of Dhokle Gulve Kumbharde Hire brothers rejected nashik news)

जिल्हा कांदा-बटाटा उत्पादक सहकारी संघाच्या १५ जागांसाठी एकूण १०५ अर्ज दाखल झाले होते. प्राप्त झालेल्या अर्जांची गुरुवारी निवडणूक अधिकारी मनीषा खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली छाननी प्रक्रिया पार पडली. यात संस्था, सोसायटी गटातून सर्वाधिक अर्ज बाद झाले आहेत. निवडणुकीसाठी तीन वर्षांत संघाशी व्यवहार करणे क्रमप्राप्तची अट नसल्याने अनेकांचे अर्ज बाद झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

अर्ज बाद झाल्यावर १५ जागांसाठी एकूण ७० उमेदवार रिंगणात असून, अंतिम उमेदवारांची यादी शुक्रवारी (ता. १) प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी खैरनार यांनी दिली. दुसरीकडे सोयायटी गटात अर्ज बाद झालेले असले, तरी हिरे बंधू यांच्यासह डोखळे, गुळवे यांचे ओबीसी गटातील अर्ज वैध ठरले आहेत.

ओबीसी एका जागेसाठी २४ उमेदवार रिंगणात राहिले असल्याने उमेदवारीसाठी चुरस होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे संघाची बिनविरोध निवडणुकीची परंपरा असल्याने त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या. माघारीला शुक्रवारपासून सुरवात होणार आहे. माघारीनंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल.

वैध ठरलेले अर्ज

गट प्राप्त अर्ज अवैध अर्ज वैध अर्ज

संस्था, सोसायटी गट (७ जागा) ३६ १९ १७

वैयक्तिक सभासद गट (३ जागा) २३ १२ ११

महिला राखीव (२ जागा) १० ०१ ०९

अनुसूचित जाती-जमाती गट (१ जागा) ०४ ०१ ०३

इतर मागासवर्गीय गट (१ जागा) २५ ०१ २४

विशेष मागासवर्गीय गट (१ जागा) ०७ ०१ ०६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojna: लाडकी बहिण योजना सरकारनं तुर्तास थांबवली! काय आहे कारण? जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

JioCinema: जिओ सिनेमा लवकरच बंद होणार! मुकेश अंबानी घेऊ शकतात मोठा निर्णय; काय आहे कारण?

Local Train Derailed : मुंबईत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला; प्रवाशांचा खोळंबा

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT