SSC Result esakal
नाशिक

SSC Result : जिल्ह्याचा निकाल 96.37 टक्‍के

अरूण मलाणी

नाशिक : महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) शुक्रवारी (ता. १७) दुपारी एकला इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने (SSC result online) जाहीर झाला. नाशिक विभागात प्रविष्ट एक लाख ९६ हजार ७१४ विद्यार्थ्यांपैकी एक लाख ८८ हजार ६६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांचे प्रमाण ९५.९० टक्‍के राहिले. विभागात सर्वाधिक ९६.३७ टक्‍के निकाल नाशिक जिल्ह्याचा राहिला आहे. (District Result 96.37 percent SSC Result Nashik News)

कोरोना महामारीच्‍या पार्श्वभूमीवर यंदा लेखी परीक्षा मार्च-एप्रिल महिन्‍यात घेण्यात आली होती. सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने निकाल उपलब्‍ध करून दिलेला असून, गुणपत्रिका वाटपाची तारीख लवकरच कळविली जाणार असल्‍याचे स्‍पष्ट करण्यात आले आहे.
गेल्‍या वर्षीच्‍या मूल्‍यांकनावर आधारित निकालाच्‍या तुलनेत या वर्षीच्‍या निकालात घसरण झालेली असली तरी लेखी परीक्षा घेतलेल्‍या त्‍याआधीच्‍या तीन वर्षांपेक्षा यंदाचा निकाल सुधारला आहे. मार्च २०२१ मध्ये विभागाचा निकाल ९९.९६ टक्‍के लागला होता. तर मार्च २०२० मध्ये ९३.७३ टक्‍के, मार्च २०१९ चा निकाल ७७.५८ टक्‍के, मार्च २०१८ चा नाशिक विभागाचा निकाल ८७.४२ टक्‍के लागला होता.

गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन सोमवारपासून
गुणपडताळणीसाठी सोमवार (ता. २०)पासून २९ जूनपर्यंत मुदत असेल. उत्तरपत्रिकेच्‍या छायाप्रतीसाठी ९ जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे. उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्‍याच्‍या दिवसापासून पुनर्मूल्‍यांकनासाठी कार्यालयीन कामाच्‍या पाच दिवसांत विहित नमुन्‍यात व शुल्‍क भरून अर्ज करता येईल.

गैरप्रकार करणाऱ्या ६४ विद्यार्थ्यांवर शास्‍ती

विभागात एकूण ६९ गैरमार्ग प्रकरणे निदर्शनात आली. यापैकी ६४ उमेदवारांना मंडळ शिक्षासूचीनुसार शास्‍ती केली आहे. यामध्ये केंद्रावरील गैरमार्ग प्रकरणे नाशिक व धुळे प्रत्‍येकी एक, तर नंदुरबारच्‍या दोन प्रकरणांचा समावेश आहे. या व्‍यतिरिक्‍त ६५ वर्ग प्रकरणिका प्राप्त झाल्या. यापैकी पाच प्रकरणे निर्दोष आहेत. नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक तीस विद्यार्थ्यांवर कारवाई झाली. धुळे १८, जळगाव १५, तर नंदुरबारच्‍या सहा विद्यार्थ्यांना शास्‍ती करण्यात आली आहे.

विभागाचा निकाल असा-

जिल्‍हा टक्‍केवारी

नाशिक ९६.३७

धुळे ९५.४३

जळगाव ९५.७२

नंदुरबार ९४.९७

विभागाच्‍या निकालाची वैशिष्ट्ये-

* ९५.०८ टक्‍के मुले झाले उत्तीर्ण

* मुलींच्‍या उत्तीर्णांचे प्रमाण ९६.९० टक्‍के

* विशेष श्रेणीत ९१ हजार ७२९ विद्यार्थी उत्तीर्ण

* ६८ हजार ५२० विद्यार्थी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण

* द्वितीय श्रेणीत २४ हजार ८९४, तृतीय श्रेणीत तीन हजार ५२३ विद्यार्थी

* इंग्रजी भाषेचा सर्वाधिक ९९.६३ टक्‍के निकाल

* गणिताचा ९७.३९, विज्ञान विषयाचा ९७.४७ टक्‍के निकाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT