chhatrapati shivaji maharaj stadium nashik esakal
नाशिक

District Sports Complex | जिल्हा क्रीडा संकुलाचा होणार कायापालट : सुनंदा पाटील

सकाळ वृत्तसेवा

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहराच्या मध्यवर्ती भागातील जिल्हा क्रीडा संकुल अर्थात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअमच्या नवीन उभारणीसाठी २५ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. यात सुसज्ज इमारतीसह ४०० मीटर रनिंग ट्रॅकसह इनडोअर खेळांच्या सुविधाही उपलब्ध होतील. नवीन स्टेडीयम उभारण्याची प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

सध्याचे स्टेडीयम एप्रिल महिन्यात पाडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी दिली. क्रीडा अधिकारी म्हणून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला, यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद. (District sports complex will be transformed Sunanda Patil nashik news)

जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून तुमची प्राथमिकता काय असेल?

सुनंदा पाटील : नंदुरबार जिल्ह्यासह नाशिकचा कार्यभार असल्यामुळे दोन्हीकडे पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न राहील. त्यासोबतच नाशिकमधील विभागीय क्रीडा संकुलास वार्षिक साधारणतः १८ लाख रुपये वीजबिल भरावे लागते. हे बिल कमी करण्यासाठी सोलर सिस्टिम बसविण्यास प्राधान्य राहील.

नाशिक जिल्हा क्रीडा संकुलाचे काय?

सुनंदा पाटील : जिल्हा क्रीडा संकुलासाठी शासनाने २५ कोटी रुपये यापूर्वीच मंजूर केले आहेत. त्यामुळे त्याच्या निर्लेखनाची प्रक्रिया सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आवश्यक कागदपत्रे सुपूर्द केली आहेत. एप्रिलमध्ये सध्याचे संकुल पाडले जाईल आणि त्यानंतर नवीन संकुल उभे राहील.

नाशिकच्या खेळाडूंना काय सुविधा मिळतील?

सुनंदा पाटील : नाशिकच्या मध्यवर्ती भागात हे संकुल उभे राहणार असल्याने येथे खेळाडूंना ४०० मीटर ट्रॅकसह इनडोअर खेळ खेळता येतील. साधारणतः १० खेळांचा यात समावेश आहे. शहरातील खेळाडूंमध्ये जागृती असल्यामुळे येथून उत्तमोत्तम दर्जाचे खेळाडू कसे तयार होतील, याचा साकल्याने विचार करत आहोत.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव कसा मिळेल?

सुनंदा पाटील : प्रत्येक गावात व्यायामशाळा किंवा ओपन जीम सुरू करण्यासाठी विकास आराखडा तयार करणार आहोत. साधारणतः १५ लाख रुपयांतून ही व्यायामशाळा उभी राहू शकते. त्यात साडेसात लाख रुपये हे शासनाचे आणि उर्वरित निधी हा ग्रामपंचायतीने उभा करावा. त्यासाठी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे प्रस्ताव देणार आहोत.

खेळाडूंच्या प्रश्नांविषयी काय?

सुनंदा पाटील : जिल्ह्यातील खेळाडूंचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील १५ तालुक्यांसाठी तीन क्रीडा अधिकारी आहेत. पण त्यांना सहकार्य करण्यासाठी पुरेसे कर्मचारी नाहीत. पण उपलब्ध कर्मचाऱ्यांमध्ये खेळाडूंच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू.

ग्रीन जीमला अनुदान मिळते, पण...

सुनंदा पाटील : ग्रीन जीम उभारल्यानंतरच आम्ही त्याचे अनुदान देतो. कालांतराने या जीम बंद पडत असल्याच्या तक्रारींची पाहणी करू. तसेच प्रत्येक तालुका व ज्या ठिकाणी तक्रारी आहेत, अशा ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल.

जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून तुमचे स्वप्न काय?

सुनंदा पाटील : जिल्ह्यातील खेळाडूंना परिपूर्ण सुविधा उपलब्ध करून देणे. त्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची तयारी आहे. क्रीडा प्रशिक्षक व खेळाडू यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्याचा मानस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT