Document Scanning esakal
नाशिक

Nashik: कुणबी पुरावे तपासणीसाठी जिल्हा, तालुकास्तरावर समिती! जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मराठवाड्याच्या धर्तीवर संपूर्ण राज्यात कुणबी नोंदी तपासण्यासाठी मोहीम सुरू झाली आहे. नाशिक जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समित्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. (District taluka level committee to investigate Kunbi evidence special room operational in collectors office Nashik)

जिल्हा यंत्रणेच्या या मोहिमेत तपासणी केलेली कागदपत्रे व नोंदी मिळालेल्या कागदपत्रांची यादी तयार करण्यासाठी संपूर्ण नाशिक महसूल प्रशासन जिल्हाधिकारी जलज शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आणि महसूल कर्मचारी यांच्या समन्वयातून काम हाती घेण्यात आले आहे.

मागासवर्ग आयोगाला इम्पॅरिकल डेटासाठी आवश्यक ती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर कार्यवाही करून उपलब्ध करून द्यावी.

मराठवाड्यासह राज्यातील उर्वरित जिल्ह्यांत जिल्हाधिकाऱ्यांनी कुणबी नोंदी तपासण्यासाठी मोहीम हाती घ्यावी, त्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी आणि त्यांच्या नियंत्रणाखाली कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून द्यावी.

त्यांना आवश्यक ते मनुष्यबळ, साधनसामग्रही तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

उत्तर महाराष्ट्रात विभागीय आयुक्त राधकृष्ण गमे यांनी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार नाशिकला जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांच्या कार्यक्षेत्रातील मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

तालुकास्तरावर विविध शासकीय विभागांतील १९६७ पूर्वीच्या कागदपत्रांची पडताळणी, तपासणी केली जाणार आहे. त्यात कुणबी कागदपत्रे आढळल्यास त्यांचे स्कॅनिंग करून जतन करण्यात येणार आहे.

तपासलेली कागदपत्रे व आढळलेल्या नोंदीची माहिती दैनंदिन विभागीय समितीस तसेच जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अद्ययावत करण्यात येणार आहेत.

जिल्हास्तरीय समिती

जिल्हास्तरावर अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली, तर तालुकास्तरावर संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ सदस्य सचिव, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा सहआयुक्त, पालिका हे सदस्य असतील, तर तालुकास्तरीय समितीत जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पंधरा तालुक्यांत तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, संबंधित तालुक्याचे तहसीलदार समितीचे सदस्य सचिव आहेत.

महापालिका उपायुक्त सामान्य प्रशासन, पालिकांचे मुख्याध्याकारी, गटशिक्षण अधिकारी, उपअधिक्षक भूमिअभिलेख, पोलिस निरीक्षक, विस्तार अधिकारी (पंचायत) पंचायत समिती, सहदुय्यम निबंधक, दुय्यम निबंधक, नायब तहसीलदार (प्रशासन) सदस्य असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT