Damaged Roads esakal
नाशिक

Nashik News: रेल्वे- नगरपरिषदेच्या विभागणीमुळे रस्त्यांची वाट! इगतपुरी शहरातील नागरिक मेटाकुटीस

पोपट गवांदे

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : येथील नगर परिषदेच्या हद्दीच्या रचनेत रेल्वेचीही मोठ्या प्रमाणात जागा असल्याने काही रस्ते नगरपरिषदेचे तर काही रस्ते रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाकडून गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यांची दुरुस्तीच झाली नसल्याने त्या रस्त्यांची चाळण झाली आहे.

याचा फटका वाहनचालकांना सहन करावा लागत असून ते नाहक नगरपरिषदेला दूषणे देत आहेत. अनेकांना मणक्याच्या आजाराने घेरले असून या रस्त्याची डागडुजी रेल्वे प्रशासन कधी करणार असा प्रश्‍न त्रस्त नागरिक विचारत आहेत. ( division of Railway Municipal Council roads damaged Citizen troubled of Igatpuri city Nashik News)

शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्यालगतच रेल्वेस्थानक आहे. त्यामुळे एक भाग नगरपरिषदेच्या ताब्यात तर दुसरा भाग रेल्वेच्या ताब्यात आहे. पूर्वी या शहरात रेल्वे कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.

मात्र कालातंराने काहींनी स्थलांतर केले तर काही निवृत्त झाले. तेव्हा रेल्वे प्रशासनाचे बलाबलही जास्त होते. गेल्या दहा वर्षापासून नगरपरिषदेची हद्द वाढत गेल्याने शहराचा विकास होऊ लागला.

मात्र यात रेल्वे प्रशासन कमी पडत चालले. आपल्या ताब्यातील रस्ते रेल्वेने ना नरपरिषदेकडे हस्तांतरित केले ना त्या रस्त्यांची देखभाल केली, यामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.

रेल्वेक्षेत्रात रस्त्यांलर खड्डेच खड्डे

शहरातील तीन लकडी पुलापासून जाणाऱ्या रेल्वे ग्राउंड, आठचाळ, जय भवानीनगर, सहा बंगला, शिवनेरी कॉलनी, रेल्वे पोलिस वसाहत, शिवाजी नगर, पंढरपुरवाडी, सह्याद्रीनगर, मिलिंदनगर, वीस बंगला, नविन वसाहन, जुना गावठा, रामनगर, ठाकूरवाडी आदी भागाकडे जाणारा रस्ता हा रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

मात्र गेल्या काही वर्षापासून या रस्त्याचे नविन बांधकाम किंवा डागडुजी झालेली नाही. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

इथले खड्डे तर दुरूस्त करा

याच रस्त्याने शेकडो वाहने ये-जा करतात. वाहने चालविताना खड्डे वाचविण्याच्या नादात अनेक दुचाकीचे अपघात देखील झाले आहेत. यात लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना मोठा त्रास होत आहे.

अनेकांना मणक्याचे आजार झालेले आहे. दुचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रेल्वे प्रशानाच्या आयओडब्लू विभागात त्वरित खड्डयाची डागडुजी करावी अशी मागणी येथील रहिवाशींनी केली आहे.

जुना आग्रारोडवरही पडले खड्डे

शहराचा मुख्य रस्ता समजला जाणाऱ्या जुन्या मुंबई-आग्रा महामार्गाचे सहा वर्षापूर्वी तब्बल १४ कोटी रुपये खर्च करुन कॉंक्रिटिकरण करण्यात आले. मात्र मागील चार वर्षापासून या रस्त्यालाही खड्डयाचे ग्रहण लागले आहे.

या रस्त्यावरील तीन लकडीपूल, राममंदिर, मार्केटरोड, रेल्वेस्थानक, स्टेट बँक, खालची पेठ, गिरणारे आदी ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकही त्रस्त झाले आहे.

"रेल्वे प्रशानाच्या ताब्यात असलेल्या रस्त्पांची देखभाल ही आयओडब्लू विभागाकडे आहे. मात्र त्यांच्या गलथान कारभारामुळे पंधरा ते वीस बंगला या भागातील नागरिक त्रस्त आहे. यातील काही निवृत्त कर्मचाऱ्यांनी याच भागात बंगले देखील बांधले आहे. मात्र त्यांना आयओडब्लू विभागाचा कारभार माहित असल्याने तेही नाईलाजाने शांत आहेत."

- रामदास पंडीत, रहिवाशी, इगतपुरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT