Nashik ZP News : केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या ग्रामपंचायत स्तरावरील २८९ कोटींच्या अखर्चित निधी आणि ‘हर घर जल’ योजनेंतर्गत नळजोडणी कामावर विभागीय उपायुक्त (विकास) उज्ज्वला बावके-कोळसे यांनी खुली नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
‘माझी वसुंधरा’ अभियानातील कमी असलेल्या कामकाजावर बावके यांनी कानपिचक्या देत, कामनिहाय नियोजन करण्याच्या सूचना केल्याचे समजते. (Divisional Deputy Commissioner upset over unspent funds nashik ZP news)
रमाई व शबरी आवाज योजनेंतर्गत कामांबाबत विभागीय आयुक्तस्तरावरून प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र देण्याचे आदेश त्यांनी दिले. श्रीमती बावके-कोळसे यांनी सोमवारी (ता. १) जिल्हा परिषदेतील रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, वर्षा फडोळ, दीपक पाटील, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, वित्त व लेखा अधिकारी भालचंद्र चव्हाण यांसह विविध विभागप्रमुख, गटविकास अधिकारी, उपअभियंते आदी उपस्थित होते.
बैठकीत प्रामुख्याने विकसित भारत संकल्प यात्रा, गोदी आवास योजना, राज्य पुरस्कृत आवास योजना (शबरी/रमाई), स्वच्छ भारत अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मंजूर घरकुलांना जागा उपलब्ध करणेबाबत, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, माझी वसुंधरा अभियान ४.०, राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान (RGSA) (ग्रामपंचायत इमारत बांधकाम), वित्त आयोग १४ वा वित्त आयोग शिल्लक निधी व १५ वा वित्त आयोग खर्चाचा आढावा घेण्यात आला.
यात १५ व्या वित्त आयोगाच्या ग्रामपंचायत स्तरावरील २८९ कोटींच्या अखर्चित निधीवर उपायुक्त बावके यांनी विचारणा केली. केंद्राचा निधी वेळात का खर्च झाला नाही, कोणती कारणे आहेत, निधी खर्चाचा नियमित आढावा होता का? असे प्रश्न उपस्थित केला. या निधीतून आवश्यक ती कामे घ्यावी, विनाकारण निधी खर्चासाठी कामे घेऊ नये, अशा सूचना त्यांनी केल्या.
जलजीवन मिशन अतंर्गत ‘हर घर जल’ अभियानात वैयक्तिक नळजोडणीच्या कामाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. या कामांबाबत उपअभियंते यांना विचारणा केली असता माहिती नसल्याने त्यांनी उपअभियंत्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. ‘माझी वसुंधरा’ अभियानाचे काम अत्यंत कमी दिसून आले. यावर बावके यांनी उत्तर महाराष्ट्रात ‘वसुंधरा’ अतंर्गत सर्वाधिक पुरस्कार जिल्ह्याने घेतले.
मात्र, काम कमी दिसते, यावर त्यांनी संबंधितांना सुनावले. तसेच कामनिहाय नियोजन करण्याच्या सूचना केल्या. रमाई व शबरी विकास अंतर्गत कामाबाबत उपायुक्त बावके यांनी विचारणा केली. त्यावर योजनेचे प्रस्ताव प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तेथून कार्यवाही झाली नसल्याचे समोर आले. त्यावर विभागीय आयुक्त कार्यालयातून पत्र देण्याचे आदेश उपायुक्त बावके यांनी दिल्याचे समजते.
विभागीय आयुक्त पुन्हा घेणार आढावा
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत बैठक होणार होती. परंतु सोमवारच्या अन्य बैठकींमुळे ते बैठकीला उपस्थित नसले तरी, त्यांच्या उपस्थितीत लवकरच पुन्हा आठ दिवसांत बैठक घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी सर्व तयारी करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.