जुने नाशिक : कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्वरित मदत मिळावी. नागरिकांना उत्साहात दिवाळी साजरी करता यावी, यासाठी पोलिस आणि अग्निशमक दलाचे जवानांनी कार्यालयात उपस्थित राहून दिवाळी साजरी केली. (Diwali 2022 of police fireman celebrated on duty in office Nashik News)
वर्षातील सर्वांत मोठा सण दिवाळी मानला जातो. कुटुंबीयांबरोबर सण साजरा करता यावा, यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. मात्र, आपल्याला उत्साहात, निर्विघ्न दिवाळी साजरी करता यावी, यासाठी पोलिस शिपाई खडा पहारा देतो. या वर्षीही त्यांनी आपली परंपरा कायम ठेवत विविध भागांत गस्त घालून कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न केला. ठिकठिकाणी चिमुकल्यांसह त्यांचे पालक फटाके फोडण्याचा आनंद घेत होते. तेव्हा चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलणाऱ्या हास्य त्या कुटुंबीयाला समाधान देऊन जात होते.
पोलिस दादा मात्र त्यांना निहाळत स्वतःच्या भावना मनातच ठेवून त्या कुटुंबीयांच्या आनंदात स्वतःचा आनंद बघत होता. उत्साह साजरा करणाऱ्या कुटुंबीयांचे सुख आपलेच सुख आहे, असे मनात धरून आपले पुढील कर्तव्य पार पाडण्यास जात असल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळाले. पोलिस ठाण्यात नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांनी आवारातच फटाके फोडून दिवाळी साजरी केली. याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थिती झगडणारे अग्निशमन दलाचे कर्मचारी कार्यालयात तळ ठोकून होते.
दिवाळीनिमित्त सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी होते. फटाक्याच्या ठिणगीने आग लागण्याची शक्यता असते. असा प्रसंग ओढावला, तर नागरिकांना वेळेत मदत मिळावी. कुठल्याही अनर्थ घडणार नाही, याची काळजी घेत वेळेत त्याठिकाणी पोचता यावे, यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी कार्यालयात तळ ठोकून होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.