Abhyang Snan kit esakal
नाशिक

Diwali Festival : पहिले अभ्यंगस्‍नान उद्या; लक्ष्मीपूजनाच्‍या तयारीची घराघरांत लगबग

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दिवाळी सणानिमित्त नागरिकांमध्ये उत्‍साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. सोमवारी (ता.२४) लक्ष्मीपूजन असून, यानिमित्त तयारीची घरोघरी लगबग बघायला मिळते आहे. दरम्‍यान, या दिवसापासून पहिले अभ्यंगस्‍नान घेतले जाणार आहे. यानिमित्त लागणारे उटणे, तेल व अन्‍य साहित्‍याच्‍या खरेदी भाविकांकडून सुरू असल्‍याचे बघायला मिळाले. (Diwali Festival 2022 First Abhyanga Snan tomorrow Preparations for Lakshmi Puja in every house Nashik news)

नरक चतुर्दशीपासून अभ्यंगस्‍नानाला सुरवात होत असते. त्‍यानुसार सोमवारी (ता.२४) नरक चतुर्दशी असल्‍याने यंदाच्‍या दिवाळीचा पहिला अभ्यंगस्‍नान या दिवशी घेतले जाणार आहे. अभ्यंगस्‍नानासाठी लागणारे सुगंधी उटणे, तेल खरेदीची लगबग नागरिकांमध्ये बघायला मिळाली.

दहा रुपयांच्‍या छोट्या सॅशेपासून तर मोठ्या कुटुंबासाठी दोनशे, अडीचशे ग्रॅमचे अभ्यंगस्‍नानासाठी लागणारे उटणे विक्रीसाठी उपलब्‍ध आहे. तर तेलामध्येही शंभर मिलिलिटरपासूनची बाटली विक्री केली जाते आहे. स्‍थानिक बाजारपेठांसह मॉल्‍समध्येही या वस्‍तूंची जोरदार विक्री होते आहे.

याशिवाय सुगंधी साबणालाही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असल्‍याचे व्‍यावसायिकांनी सांगितले. दरम्‍यान सोमवारी (ता. २४) लक्ष्मीपूजनदेखील असल्‍याने धनदेवता लक्ष्मीच्‍या स्‍वागताची तयारी भाविकांकडून सुरू होती. पूजेसाठी लागणारे साहित्‍य, प्रसादासाठी लाह्या, बत्तासे खरेदी केले जात होते.

चाकरमान्‍यांना घराची ओढ

नोकरीनिमित्त परगावात राहात असलेल्‍या चाकरमान्‍यांना दिवाळीनिमित्त घराची ओढ लागलेली बघायला मिळत आहे. घराकडे रवाना होत असलेल्‍या प्रवाशांनी बसस्‍थानके गजबजलेली आहेत. दरम्‍यान शुक्रवारपासून एसटीचे हंगामी भाडेवाढ लागू झाल्‍याने प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT