Different types of sky lanterns are available in Malegaon market. esakal
नाशिक

Diwali Festival: विविधरंगी आकाशकंदीलांनी व्यापली बाजारपेठ! 100 रुपयांपासून सुरवात

प्रभाकर बच्छाव

येसगाव : लक्ष लक्ष दिव्यांच्या दीपोत्सवाचे वेध सर्वांनाच लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या स्वागतासाठी विविध व्यावसायिकही सज्ज झाले आहेत. दीपोत्सवाची सर्वत्र तयारी सुरू झाली आहे.

दारासमोर आकाश कंदील दिसल्यास दिवाळी आल्याची चाहूल लागते. यानिमित्ताने आकाशकंदलची बाजारपेठ देखील सजली आहे.

विविध आकारात व विविध प्रकारात आकाशकंदील विक्रीसाठी बाजारात आले आहेत. महागाईमुळे यावर्षी १५ ते २० टक्क्याने आकाश कंदील मागे वाढ झाली आहे. (Diwali Festival Market covered with multicolored sky lanterns Starting from Rs 100 nashik)

जाड प्लास्टिकचे विविध रंगात्मक रचनात्मक आकार व रंगाचे खास आकर्षण दिसून येत आहे. झुंबर सारखे आकाराच्या आकाश कंदील मनाला आकर्षित करतात. लहान कंदील १०० रुपयापासून ५०० रुपया पर्यंत आकाश कंदील आलेले आहेत.

पुणे, मुंबई, येथून कच्चामाल आणून आकाशकंदील कारागिरांनी चांगल्या प्रकारे कलाकुसरी वापरून आकाशकंदील तयार केलेले आहेत.

दिवाळी येण्यापूर्वी दोन-तीन महिन्यापासून कारागीर आकाश कंदील बनवायला घेतात. स्थानिक तसेच इतर विविध प्रकारचे आकाशकंदील विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहे. ज्या कंदिलांची रंगसंगती चांगली तिकडे गिऱ्हाइकांचा कल असतो.

आकाशकंदील मुंबई, पुणे, कानपूर, कोलकत्ता येथून येतात. लहान आकाश कंदील नगा प्रमाणे किंवा डझनावर उपलब्ध आहेत. पुर्वी आकाश कंदील बांबूच्या काड्यांपासून तयार करत होते.

कालांतराने आकाश कंदील घरी तयार करण्याऐवजी वेगळ्या आकारातील आणि रंगातील आकाश कंदीलांना पसंती मिळू लागल्याने ग्राहक बाजारातूनच आकाश कंदील खरेदी करत आहे.

आकाशकंदिलच्या किमती (रूपयांमध्ये)

फ्लॉवर २००ते २५०

मटकी कपडा चायनीज १८० ते २५०

स्टार कागदी १०० ते २५०

षटकोनी १४० ते ३००

फायबर बॉल २५० ते २७५

लहान डझनावर १०० ते १८०

१६ कोनी ५०० पासून पुढे

"यावर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळे अद्याप बाजारपेठेत गर्दी दिसून येत नाही. ग्राहकांची प्रतीक्षा लागून आहे. दिवाळी सण जस जसा जवळ येईल तस तशी आकाशकंदिल यांना मागणी वाढण्याची शक्यता आहे."- सचिन अमृतकर, आकाशकंदील विक्रेता, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT