Various types of fish are available for sale in the market esakal
नाशिक

Nashik News: दिवाळी उलटताच मासे बाजार तेजीत! बईहून आवक वाढली, शेतमळ्यांमध्ये पार्ट्यांची रेलचेल

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : दिवाळी उलटताच येथील मासे बाजार तेजीत आला आहे. खवय्यांची मासे खरेदीसाठी गर्दी होत आहे. गिरणासह विविध धरणातील तसेच तालुका परिसरातील तलावांमधील मासे येथे विक्रीसाठी येत आहेत.

गेल्या दोन दिवसापासून मुंबई येथून माशांची आवक वाढली आहे. दिवाळीनंतर खवय्ये व मित्र परिवाराच्या पार्ट्या व सामीष जेवणावळींची रेलचेल आहे. विशेषत: शेतमळ्यांमध्ये व धरण परिसरात जेवणावळी झडत आहेत.

येथील बाजारात दोनशे ते आठशे रुपये किलो दरम्यान मासे मिळत आहेत. मुरी (बारीक मासे) हजार रुपये किलोने विकले जात आहेत. दरम्यान मटण दुकानांवरही खवय्यांची तोबा गर्दी होत आहे. (Diwali passes fish market booms Inflow from mumbai increased parties in farms Nashik News)

दिवाळीच्या गोड फराळानंतर अनेक जण मटण, चिकन, माशांवर ताव मारीत आहेत. सणाचा माहोल कायम असून नातेगोते व मित्र परिवाराच्या गाठीभेटी होत आहेत. त्यामुळे थोडा चेंज म्हणून मांसाहाराला महत्त्व दिले जात आहे.

येथील मासे बाजारातील उलाढाल वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेल्या गिरणा धरणात ९५ टक्के जलसाठा आहे. धरणातील मच्छीमारीचा ठेका देण्यात आलेला आहे. ठेकेदाराकडून किरकोळ व्यावसायिक मासे खरेदी करतात.

याशिवाय तालुक्यासह कसमादेतील धरणे व तलावातील मासे येथील बाजारात विक्रीसाठी येत आहेत. येथील रामसेतू पुलाजवळील मच्छी बाजारात माशांची सर्वाधिक विक्री होत आहे.

ग्रामीण भागातही किरकोळ मत्स्य विक्रेत्यांचा व्यवसाय वधारला आहे. आठवडे बाजारांमध्ये मासे खरेदीसाठी गर्दी होत आहे.

असे आहेत माशांचे दर

भडका, पंकज, नमन्ना, आटबांगडा यांचे दर किलोला दोनशे रुपये आहे. बोंबील मासा ३०० रुपये दराने मिळत आहे. मलई, काळी वाम, रउ, कटला, बांगडा या जातीच्या माशांचे दर किलोला चारशे रुपये आहे.

शिंगाडा, मरळ, कोळंबी, रावस, कोंबडा हे मासे ६०० रुपये दराने मिळत आहेत. पिवळी वाम, पॉपलेट, सुरमई मासे ८०० रुपये किलोने विकले जात आहेत. मुरी हजार रुपये किलोने मिळत आहे.

मटण ६८०, चिकन ४०० ते ६००

माशांबरोबरच मटण व चिकनची दुकानेही हाऊसफुल आहेत. बोकडाचे मटण ६४० ते ६८० रुपये किलोने मिळत आहे.

गावराणी चिकन ६००, कॉकलर ३४० ते ४०० रुपये, फार्म गावराणी ४०० ते ४५० किलोने विकले जात आहे.

बॉयलरचे एकाच शहरात दोन भाव

बॉयलर चिकन खाणारा ग्राहक शहरात मोठ्या प्रमाणावर आहे. दिवाळीनंतर बॉयलर चिकनला मागणी वाढली आहे.

कॅम्प-संगमेश्‍वरच्या पश्‍चिम भागात बॉयलर चिकन २०० ते २१० रुपये किलोने मिळत आहे. मात्र मुस्लीम बहुल असलेल्या शहरातील पूर्व

भागात अनेक ठिकाणी बॉयलर चिकन १५० ते १७० रुपये किलोने विकले जात आहे. कॅम्प-संगमेश्‍वरातील अनेक खवय्ये चिकन घेण्यासाठी पूर्व भागात जात आहेत. एकाच शहरात चिकनचे दोन दर आहेत.

विक्री अधिक असल्याने पूर्व भागातील व्यावसायिकांना कमी भावात चिकन विक्री करणे परवडत असल्याचे सांगण्यात येते.

"गेल्या दोन ते तीन महिन्यापासून मासे बाजार मंदीत होता. दिवाळीनंतर माशांना मागणी वाढली आहे. येथील बाजारात तालुका परिसरातील तलावांमधून सर्वाधिक मासे येत आहेत. गिरणा धरणातील मासे ठेकेदाराकडून विकत घ्यावे लागतात. मोठे मासे मुंबई येथून येत आहेत. हिवाळ्यात बाजारात तेजी राहील अशी अपेक्षा आहे."- सागर शिवदे, मत्स्य विक्रेते, मालेगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT