silence in bangle shop. esakal
नाशिक

Diwali Shopping : बांगड्यांची किणकिण यंदाच्या दिवाळीत क्षीण

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : दिवाळीनिमित्त जिल्हाभरात दहा दिवस बांगडी व्यवसायात सुमारे चार कोटींची उलाढाल होण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान पावसामुळे ग्रामीण भागात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. (Diwali shopping bangles business hit by loss in rural areas This year turnover is possible at just 4 crores Nashik News)

बांगडी व्यवसाय शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक जोमात असतो. त्यामुळे शहरातून होलसेल व्यावसायिकांकडून ग्रामीण भागातच मोठ्या प्रमाणावर बांगड्यांचा माल जातो. यंदा आत्तापर्यंत जोरदार पाऊस झाल्याने ग्रामीण भागातले शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती पिकांवर अवलंबून असणाऱ्या येथील नागरिकांना आर्थिक संकटास सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे दिवाळीही साध्या पद्धतीने साजरी होत आहे. त्याचा परिणाम बांगडी व्यवसायावर झाला आहे. ग्रामीण भागातील छोटे-मोठे विक्रेत्यांकडून मालाची मागणी घटली आहे.

दिवाळीमध्ये शंभर टक्के व्यवसाय होतो; मात्र आतापर्यंत केवळ २५ टक्के तर भाऊबीजनिमित्त माहेरवासिनी माहेरी आल्यावर पुढील तीन-चार दिवसांत २५ टक्के अशाप्रकारे संपूर्ण दिवाळीच्या दहा दिवसांत केवळ ५० टक्के बांगड्यांची खरेदी-विक्री होणार आहे. रकमेत विचार केला तर होलसेलर मोठे व्यावसायिक, तसेच फेरी मारणारे व्यावसायिक असे सर्व प्रकारच्या व्यावसायिक मिळून सुमारे तीन ते चार कोटींची उलाढाल होणार असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

पारंपरिक बदलत चाललेली संस्कृती, पाश्चात्त्य संस्कृतीचा परिणाम यामुळे बांगड्या घालण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पस्तीस वर्षांच्या पुढील महिला काही प्रमाणात बांगड्या घालतात. नवीन पिढीतील मुली बांगड्या घालण्यापासून दूर राहणे पसंत करतात. याचा देखील परिणाम व्यवसायावर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

कच्चा मालाचे दर वाढले

कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, महागाई यामुळे बांगड्यांच्या दरांमध्ये सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. काचेच्या बांगड्या १० रुपयांपासून तर १५० डझन, तर मेटल बेन्टेक्सच्या बांगड्या २० रुपयांपासून १०० जोडी मिळत आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा बांगड्यांच्या व्यवसायात तेजी येण्याची शक्यता वाटत होती; परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही, अशा प्रतिक्रिया व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात आल्या.

"दिवाळीत १०० टक्के व्यवसाय होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात केवळ ५० टक्के व्यवसाय होत आहे. त्यातील अर्धा व्यवसाय उधारीवर झाला आहे. एकूणच यंदाची दिवाळी या व्यवसायासाठी तशी निराशाजनकच आहे." - अरुण गुप्ता, व्यावसायिक, नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT