इंदिरानगर (नाशिक) : भाजपप्रणीत श्री प्रतिष्ठान आणि (कै.) धर्मराज बडोदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) यांच्या जयंतीनिमित्त २५ बाय ४० फुटांचा थ्रीडी फलक लावत देखावा सादर करण्यात आला.
यात दलित, शोषित यांचे मनात शिक्षणाचे महत्त्व रुजविले, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या हातात पुस्तके देऊन त्यांचे मन शिक्षणाकडे वळविले. त्यातून डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शास्त्रज्ञ घडले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे व त्यांनी तयार केलेल्या राज्यघटनेमुळे (Constitution) देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची संधी अनेकांना मिळाली. त्यातील माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन (K R Narayanan), डॉ. अब्दुल कलाम (APJ Abdul kalam) व राष्ट्रपती रामनाथ कोवींद (Ram Nath Kovind) यांच्या प्रतिमा वापरण्यात आल्या. देखना बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रतिष्ठानचे संस्थापक तथा माजी नगरसेवक ऍड. श्याम बडोदे यांची संकल्पना होती.
आमदार सीमा हिरे यांनी प्रतिमापूजन केले. या वेळी भाजप द्वारका मंडल अध्यक्ष सुनील देसाई, प्रफुल्ल काजले, डॉ. चंद्रशेखर पाठक, गणेश राऊत, सुधाकर गायधनी, सुभाष शेवाळे, विजयराव महाले, नीलेश गिते, मुन्ना साळवे हजर होते. भाजपप्रणीत श्री प्रतिष्ठानचे जयवंत टक्के, गोपाळ आव्हाड, आशिष दाभोळकर, भारत शिरसाट, योगेश रेवगडे, प्रशांत पाटील, मनीष पाटील, किरण पाटील, परेश पाटील, गणेश रत्नपारखी, सतीश यादव, मुकुल वाघ, गोकूळ फड, राम बडोदे, राहुल कासार, मनीष लोखंडे, रोहन नहीरे, अजय बडोदे, विशाल बडोदे, उदय बडोदे, अनिकेत पवार, निखिल भदाने, गौरव पाटील, सुजित मोरे, दीपक जोशी, संदीप असोले तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.