NMC News : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टर व मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टरांचे ९६ पदे मानधनाने भरण्यासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत डॉक्टरांनी पुन्हा एकदा महापालिकेच्या सेवेकडे पाठ फिरवली आहे. मात्र नर्सेस व एएनएम पदासाठी तब्बल अडीचशे अर्ज प्राप्त झाले.
त्यातही माजी नगरसेवक व लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे भरती करताना वैद्यकीय विभागाची कसरत होत आहे. (Doctor is not ready to provide service on nmc doctor post nashik news)
दरम्यान, महापालिकेत सेवा करण्यास डॉक्टर इच्छुक नसल्याच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागाकडून ‘आयएमए’ ला विनंती करून डॉक्टरांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली.
कार्पोरेट कंपन्यांपेक्षा अधिक तोडीस तोड महापालिकेच्या रुग्णालयांचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्यात आता नव्याने १०५ आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या व्यतिरिक्त पूर्वीपासूनच ३० शहरी आरोग्य केंद्र शहरात आहे, तर पाच मोठी रुग्णालय आहे. या रुग्णालयांचे इन्फ्रास्ट्रक्चर जवळपास अडीच लाख चौरस फुटाचे आहे. एवढे असतानाही रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची मोठी कमतरता आहे.
त्यामुळे रुग्णांना सेवा देताना उपलब्ध डॉक्टरांना मोठे कसरत करावी लागते. वैद्यकीय विभागात विशेष तज्ज्ञांसह १८९ पदे मंजूर आहेत. त्यातील सध्या ६५ डॉक्टर कार्यरत आहे. १२४ डॉक्टरांची पदे रिक्त आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची ६१ पदे रिक्त आहे.
वैद्यकीय अधीक्षक चार, फिजिशियन आठ, स्त्रीरोगतज्ज्ञ सोळा, बालरोगतज्ज्ञ १६, भूलतज्ज्ञ ९, सर्जन आठ, अस्थिव्यंगतज्ज्ञ चार, कान- नाक- घसा तज्ज्ञ चार, नेत्र शल्यचिकित्सक चार याप्रमाणे डॉक्टरांची पदे रिक्त आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरेशी सुविधा दिली जात नाही. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागाने ५४ डॉक्टरांचे ९६ पदे मानधनावर भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जाहिरातदेखील काढली.
माजी नगरसेवकांचा दबाव
महापालिकेच्या वैद्यकीय सेवेला मुख्यत्वे करून डॉक्टरांची आवश्यकता आहे, मात्र ४० ते ७५ हजार रुपये मानधनावर डॉक्टर सेवा देण्यास तयार नाही. त्यापेक्षा खासगी रुग्णालयांमध्ये प्रॅक्टिस केल्यास डॉक्टरांना अधिक पैसे मिळतात. त्यामुळे महापालिकेत सेवा देण्यास तयार नाही.
माजी नगरसेवकांना महापालिकेची रुग्णालय खरोखरच चालवायची असेल तर डॉक्टरांसाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना वैद्यकीय विभागाकडे प्राप्त झालेल्या अडीचशे अर्जांमधून ओळखीच्यांना सेवेत रुजू करून घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. दोन दिवसात जनरल फिजिशियनसाठी एकही अर्ज आला नाही. फिजिशियनसाठी मात्र दोन, बालरोगतज्ज्ञ पदासाठी एक, दंत शल्यचिकित्सक पदासाठी तीन अर्ज आले. स्टाफ नर्स व एएनएम पदासाठी अडीचशे अर्ज प्राप्त झाले. बीएएमएस पदासाठीदेखील अधिक अर्ज दाखल झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.