नाशिक : शहरातील भटक्या श्वानांवर नियंत्रण आणण्यासाठी सुरू असलेल्या निर्बिजीकरण प्रक्रिया एक महिन्यांपासून बंद झाली आहे. ठेकेदार कंपनीबाबत तक्रार आल्याने पशुसंवर्धन विभागाने काम बंद करण्याचा निर्णय घेतला.
२००७ पासून शहरात श्वान निर्बिजीकरणाचे काम दिले जाते. दरवर्षी निविदा काढल्या जातात. मागील वर्षाचे काम पुणे येथील ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन संस्थेला देण्यात आले. शहरातील भटके श्वान पकडून त्यांच्यावर विल्होळी येथील महापालिकेच्या जुन्या जकात नाका इमारतीमध्ये निर्बीजीकरणाची प्रक्रिया पार पाडली जाते. चौदा वर्षात ७८ हजार भटक्या व मोकाट कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने केला आहे. या वर्षीच्या ठेक्यामध्ये अकरा महिन्यात सात हजार ९८८ कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे.
भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण कामात भटक्या कुत्र्यांना पकडून शस्त्रक्रिया करणे, तीन दिवसानंतर जेथून श्वान पकडले तेथून पुन्हा त्याच ठिकाणी सोडणे बंधनकारक आहे. दरम्यान, श्वान निर्बीजीकरणाच्या तक्रारी वाढत असल्याचे कारण देत पशुसंवर्धन विभागाने पर्यायी व्यवस्था न करता १७ नोव्हेंबरपासून कामकाज बंद केले आहे. नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येतील व श्वान निर्बिजीकरण पूर्ववत सुरू करण्याच्या सूचना महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे यांनी दिली.
वर्षनिहाय झालेले श्वान निर्बीजीकरण
वर्ष - निर्बीजीकरण झालेले श्वान
२००७-०८ - १,७४९
२००८-०९ - ४,४५७
२००९-१० - ८,३७४
२०१०-११ - ९,६१६
२०११-१२ - १०,१४८
२०१२-१३ - २,८०१
२०१३-१४ - ६,७११
२०१४-१५ - ६,८०३
२०१५-१६ - ६,३१४
२०१६-१७ - ६,४६०
२०१७-१८ - ८,८९७
२०१८-१९ - ७,८५२
२०२०-२१ - ६,१८७
२०२१-२२ - ७,९८८
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.