जुने नाशिक : नानावली येथील खासगी वाहनांमध्ये अनधिकृतरीत्या गॅस भरणा करणारा अड्डा प्रभारी धान्य वितरण अधिकाऱ्यांनी भद्रकाली पोलिसांच्या मदतीने उद्ध्वस्त केला. दोन रिक्षांसह ३३ घरगुती वापराचे गॅस सिलिंडर, असा दोन लाख आठ हजारांचा ऐवज जप्त केला. प्रभारी धान्य वितरण अधिकारी कैलास पवार यांना नानावली येथे अनधिकृतरीत्या वाहनात गॅस भरणा सुरू असल्याची माहिती मिळाली. (Domestic gas cylinder tanks seized from unauthorized gas filling stations Nashik Crime News)
त्यांनी भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांना माहिती दिली. गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार कैलास पवार यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी केली. याठिकाणी रिक्षांमध्ये अनधिकृतरीत्या घरगुती गॅस भरला जात असल्याची खात्री झाली. संशयित रिझवान शफीउद्दीन मुल्ला (४१, रा. कठडा) यास ताब्यात घेतले.
अड्डा त्याचाच असल्याचे त्याने कबुली दिली. पोलिसांनी कारवाई करत रिक्षा (एमएच- १५- एफयू- ६६१७), (एमएच- १५- एके- ५४८६), घरगुती गॅसचे २५ भरलेले सिलिंडर, ८ रिकामे सिलिंडर तसेच दोन इलेक्ट्रिक वजन काटे आणि दोन गॅस भरण्यासाठीचे येणारे यंत्र असे सुमारे दोन लाख आठ हजाराचा ऐवज जप्त केला. पोलिस कर्मचारी विशाल काठे यांच्या तक्रारीवरून रिझवान मुल्ला याच्याविरुद्ध सोमवारी (ता.१०) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.