Neo Metro project esakal
नाशिक

Neo Metro Project: मेट्रो प्रकल्पाला अद्यापही मंजुरी नसल्याने डबलडेकर पूल अधांतरी

सकाळ वृत्तसेवा

Neo Metro Project : नाशिक रोड ते द्वारका दरम्यान वाढत्या वाहतुकीवर उपाय म्हणून डबलडेकर पुलाचे नियोजन करण्यात आले, परंतु निओ मेट्रो प्रकल्पाला मंजुरी नसल्याने पूल बांधायचा कसा, यावर खल होत असतानाच मंजुरीपूर्वीचं पुलाचे डिझाईन तयार करण्याचा निर्णय बुधवारी (ता.१) मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मेट्रो निओ प्रकल्प अद्यापही लालफितीत अडकल्याचेही यानिमित्ताने अधोरेखित झाले.

नाशिक शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. उपनगरेदेखील आता मुख्य शहराला येऊन मिळत आहे. उपनगरांमध्येही उपनगरे मोठ्या प्रमाणात तयार होत असल्याने या सर्वांचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. (double decker bridge is in limbo as metro project is still pending approval nashik news)

शहरांमध्ये सद्यःस्थितीत दिवसभरात अडीच ते पावणेतीन लाख वाहने रस्त्यांवर धावतात. त्यात नाशिक शहरातून मुंबई-आग्रा व नाशिक-पुणे हे दोन मोठे मार्ग गेले आहेत. त्यामुळे अवजड वाहतूकदेखील मोठ्या प्रमाणात होते. गरवारे पॉइंटपासून ते आडगावपर्यंत उड्डाणपूल तयार झाल्याने काही प्रमाणात वाहतुकीवरचा ताण कमी झाला.

मात्र नाशिकहून पुण्याकडे जाताना नाशिक रोडपर्यंत अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. द्वारका, काठे गल्ली, फेम सिनेमा, डॉ. आंबेडकरनगर, उपनगर, नेहरूनगर, अंधशाळा, दत्तमंदिरपर्यंतच्या चौफुलीवर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होते.

वाढत्या वाहतुकीमुळे सागरमाला प्रकल्पांतर्गत उड्डाणपूल टाकण्याचे निश्चित झाले. मात्र याच भागातून नव्याने टायर बेस्ट मेट्रो प्रकल्प होणार असल्याने त्याचादेखील मोठा प्रश्न निर्माण झाल्याने केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दत्त मंदिर ते द्वारका असा डबल डेकर उड्डाणपूल मंजूर केला. उड्डाणपुलासाठी तरतूददेखील केली. मात्र अद्याप ना मेट्रो, ना उड्डाणपूल झाला.

त्यामुळे हादेखील प्रकल्प बासनात गुंडाळला जातो की काय अशी शंका निर्माण झाली. परंतु डबलडेकर पुलासंदर्भात बुधवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे बैठक झाली.

त्यात मेट्रो प्रकल्पाला अद्यापही मंजुरी नसल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याने डबलडेकर पूल तयार करायचा तरी कसा व कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला. मेट्रोचे अधिकारी नागुलकर यांनी अद्याप मंजुरी नसल्याची माहिती बैठकीत दिली.

मात्र प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर डबलडेकर पूल गरजेचा असल्याने प्रकल्पाचे डिझाईन तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री भुसे यांनी दिल्या. बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे भाऊसाहेब साळुंखे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे आदी उपस्थित होते.

सागरमाला प्रकल्पात महामार्गाचा समावेश

‘सागरमाला प्रकल्प’ हा भारत सरकारचा एक व्यूहात्मक व ग्राहकाभिमुख प्रकल्प असून या प्रकल्पात द्वारका ते नाशिक रोड हा भाग समाविष्ट आहे. नाशिक रोड ते द्वारका हा पुणे-नाशिक, राष्ट्रीय महामार्गाचा एक भाग असून त्यावर मोठ्या प्रमाणात नागरी वाहतुकीसह अवजड वाहतूक होत असते.

विषम वाहतुकीमुळे या सात किलोमीटर अंतरावर नेहमीच अपघात आणि गर्दी होते. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. महामेट्रोकडे मेट्रोची अंतिम मंजुरी प्रस्तावित आहे. नाशिक रोड - द्वारका या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास नाशिककरांची वाहतूक कोंडीची वाताहात थांबणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT