NAFED Onion Purchase : नाफेडमार्फत योग्य त्या किमतीत कांदा खरेदी कधी सुरु होणार याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. सध्या कांद्याला ६०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल असा अत्यल्प भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नाही यामुळे शेतकरी नाफेड खरेदीकडे डोळे लावून बसला आहे. (Doubts about onion purchase through NAFED Farmers in trouble due to low price of onion nashik news)
कांदा फेडरेशन व प्रोड्युसर कंपनीच्या वतीने कांदा साठवणूक करण्याच्या उद्देशाने मोठमोठी शेड उभे केले जात असल्याने नाफेडकडून कांदा खरेदी केली जाणार असल्याचे संकेत असले तरी ती कधीपासून सुरु होईल हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
सध्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन निघत असले तरी अवकाळी पावसामुळे कांदा पीक संकटात सापडले आहे. याचा परिणाम भावावर होत असून दर घसरले आहेत.
परिणामी शेतकऱ्यांना कांदा विक्री करताना फटका बसत असून कमी किमतीत कांदा विक्री करावी लागत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ‘नाफेड’ मार्फत कांदा खरेदी करण्याबाबत मागणी होत आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
खरेदीबाबत संभ्रम कायम
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे नाफडेकडून कांद्याची खरेदी कधी सुरु होणार याबाबत संभ्रम कायम आहे. एका बाजूला चाळीतील कांदा खराब होत आहे तर बाजारात कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
तसेच, यंदा कांदा टिकविण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, नाफेडकडून कांद्याची खरेदी सुरु करावी, कांद्याला चांगला दर मिळावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.
"गत महिन्याभरात अवकाळी पाऊस व गारपीट मुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा प्रचंड प्रमाणात खराब झाला आहे. गारपीट व अवकाळी पावसामुळे चाळीत साठवणूक केलेला कांदाही खराब होऊ लागला आहे. तो बाहेर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे तर दुसरीकडे नाफेडच्या कांदा खरेदी कडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत, नाफेड मार्फत कांदा काय भावाने खरेदी केला जाईल याबाबत मात्र साशंकता कायम आहे."
- कुबेर जाधव, संपर्क प्रमुख, कांदा उत्पादक शेतकरी संघटना.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.