scene from shivputra sambhaji play esakal
नाशिक

Dr. Amol Kolhe| छत्रपती शिवाजीराजे अन् संभाजी महाराजांना अकारण रोजच्या राजकारणात कुणीही ओढू नये: डॉ. कोल्हे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज अन संभाजी महाराजांना अकारण रोजच्या राजकारणात कुणीही ओढू नये, अशी अपेक्षा अभिनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज येथे व्यक्त केली.

तसेच येत्या तीन महिन्यात भारत चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकणार असल्याने तरुणाईपुढे बलशाली राष्ट्रासाठी आदर्श ठेवावा लागेल, अशीही भूमिका त्यांनी मांडली. (Dr Amol Kolhe statement about use of names Chhatrapati Shivaji Raje and Sambhaji Maharaj in politics nashik news)

नाहक वादाला हवा दिली जाते. त्यातून बेरोजगारी, महागाई, महिलांची सुरक्षा असे प्रश्‍न बाजूला पडत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपाया घसरतो आहे. त्यामुळे आता मुलभूत प्रश्‍नांविषयी बोलून ते सोडवण्यासाठी आपली रणनिती काय, नियोजन काय याचा उहापोह करणे आवश्‍यक आहे, असे सांगून डॉ. कोल्हे म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यापुढे कोणताही पक्ष, पद, कोणतेही राजकारण माझ्यासाठी शून्य आहे.

प्रतिक्रिया वादापेक्षाही सकारात्मक आणि शाश्‍वत कृती असायला हवी. त्याचदृष्टीने इतिहास योग्य पद्धतीने तरुणाईपर्यंत पोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. जाणता राजा हे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले जाते.

ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार हेही सांगतात. मात्र श्री. पवार यांना जाण असणे, माहिती असणे हे छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणारे नाही. मध्यंतरी, कुणीतरी एका नेत्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती.

कोल्हेंची संभाजी महाराजांची भूमिका

जगदंब क्रिएशनच्या ‘शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचे प्रयोग नाशिकमधील तपोवनातील बाबूशेठ केला मैदानावर २१ ते २६ जानेवारीला दररोज सायंकाळी सहाला सादर होणार आहेत. महेंद्र महाडिक लिखीत-दिग्दर्शित महानाट्यात डॉ. कोल्हे हे संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकरतात.

याच महानाट्याची माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. कोल्हे बोलत होते. जयप्रकाश जातेगावकर, प्रफुल्ल टावरे यावेळी उपस्थित होते. १८ एकराच्या परिसरात तीन मजली सेट, घोडे-तोफा आणि जवळपास दोनशे कलाकारांच्या संचासह हे महानाट्य सादर होईल. महानाट्यासोबत मैदानात शिवसृष्टी निर्माण करण्यात येणार आहे.

शिवसृष्टीत महाराजांचे स्वराज्याचे संकल्प पूर्णत्वास नेणारे विविध किल्ले-गडाच्या आकर्षक व मूर्तीमंत प्रतिकृती पाहता येतील. महिला बचतगटांचे पन्नासहून अधिक खाद्य पदार्थांचे स्टॉल्स असतील. महानाट्यासाठी दहा हजार प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था असेल. सहा पातळ्यांवर महानाट्य सादर होईल.

एलईडी, ग्राफीक्स वापर केला जाईल. तसेच ऑक्टोंबरपासून महानाट्य हिंदीतून पाहण्याची संधी उपलब्ध होईल. येत्या रविवारपासून (ता. ८) नाशिकमध्ये ‘टीम' असेल. तिच्या माध्यमातून नाशिकमधील शंभर कलावंतांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था असेल.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

विश्‍वास पाटीलांना महानाट्याचे निमंत्रण

संभाजीराजांना ‘धर्मवीर' म्हणून अवघा महाराष्ट्र गेली १०५ वर्षे ओळखतो आहे. कागदपत्रे साक्ष देतात. ‘स्वराज्यरक्षक संभाजी' हे ‘मार्केटेबल टायटल' श्री. अमोल कोल्हे यांनी आपल्या सिरीयलसाठी वापरले, असे कादंबरीकार विश्‍वास पाटील यांनी सोशल मीडियात म्हटले आहे.

त्याबद्दल प्रतिक्रिया देताना डॉ. कोल्हे म्हणाले, की धर्मवीरपेक्षा स्वराज्यरक्षक ही बिरुदावली महत्वाची आहे. मुळातच, ती मालिका २०२० मध्ये संपली आहे. त्यामुळे श्री. पाटील आणि मी एकाच वाटेचे वाटसरु आहोत आणि मी माझे काम करतो व ते योग्य आहे. महानाट्य पाहण्यासाठी श्री. पाटील यांनी यावे. त्यातून किंतू-परंतु दूर होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

SCROLL FOR NEXT