नाशिक : बंदीस्त सभागृहातील कार्यक्रमात एका विंगेतून दुसऱ्या विंगेतील वावर अगदी सहज होतो, परंतु एखाद्या मैदानावरील भव्य व्यासपीठावर वावरताना हातात केवळ काही क्षण असल्याने मोठी दमछाक होते.
परंतु जेव्हा प्रेक्षकांमधून ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ चा जयघोष कानावर पडतो, तेव्हा क्षणात सर्व थकवा दूर होऊन काळीज भरून येते, अशी भावना अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. (dr amol kolhe statement on Shivputra Sambhaji Mahanatya started form today nashik news)
लेखक व दिग्दर्शक महेंद्र महाडीक लिखित व दिग्दर्शित ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे आयोजन २१ ते २६ जानेवारीदरम्यान तपोवनातील स्व. बाबूशेठ केला मैदानावर करण्यात आले आहे. महानाट्यात छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी साधुग्राममधील महानाट्य होत असलेल्या जागेस भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी झालेले काम पाहून समाधान व्यक्त करत संबंधितांना काही सूचनाही केल्या. या वेळी संवाद साधताना डॉ. कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून बलीदानापर्यंतचा धगधगता इतिहास पुन्हा जाणून घेण्यासाठी नाशिककरांनी सहकुटुंब या महानाट्याचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावण्याचे आवाहन केले.
प्रयोगाच्या चार दिवस आधीच नाशिककरांनी तिकिटे खरेदीसाठी दिलेल्या मोठ्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले. नाशिककरांच्या मोठ्या प्रतिसादामुळे राज्यभरात या महानाट्याची नोंद घेतली जाईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
शंभर स्थानिक कलावंत
महानाट्यासाठी ४५ फुटांचे तीन मजली भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. यात दोनशे कलावंतांसह तब्बल २२ घोडेही असणार आहे. महानाट्यासाठी हत्ती आणण्याची योजना आखण्यात आली होती, परंतु त्यासाठी परवानगी मिळाली नाही, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
नाटकात स्थानिक शंभर कलाकारांचा समावेश असून प्रमुख भूमिकांत डॉ. गिरीश ओक, प्राजक्ता माळी, महेश कोकाटे आदी दिग्गज कलावंत असतील, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.