Dr. Babasaheb Ambedkar esakal
नाशिक

Dr. Babasaheb Ambedkar : नाशिक रोडला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींचे जतन

हर्षवर्धन बोऱ्हाडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांतीची ज्योत समाजामध्ये पेटवताना नाशिक शहराचा मुख्य भाग असणारा नाशिक रोड परिसरात अनेक दिवस वास्तव्य केल्याच्या नोंदी आढळून येतात.

डॉ. भीमराव चांगदेव साळुंखे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंगरक्षक होते. भीमराव साळुंखे हे नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातील होते. त्यांनी लिहून ठेवलेल्या दस्तऐवजात नाशिक रोडमधील डॉ. आंबेडकर यांनी घेतलेल्या सभा आणि केलेली कामांचा संदर्भ आढळून येतो. डॉ. साळुंखे यांचे पुत्र प्रताप भीमराव साळुंखे यांनी नाशिक रोडमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीच्या आठवणी जतन करून ठेवले आहे.


रेल्वे स्टेशनजवळील बौद्धविहाराची स्थापना १९३७ ला झाल्याची नोंद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १५ मे १९४७ ला रेल्वे स्टेशनवर पंजाब मेल या रेल्वेने आले होते. रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या बौद्ध स्मारक येथे डॉक्टर आंबेडकरांनी वास्तव्य केले होते. या ठिकाणी अनेक वेळा चळवळीतील कार्यकर्ते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी एकत्र जमून विचारविनिमय करीत. सध्या येथे नवीन कोर्ट असणाऱ्या डिस्टलरी बंगला नंबर २ येथे डॉ. आंबेडकर यांनी अनेक दिवस वास्तव्य केले होते.

कामगारांच्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी डॉ. आंबेडकर यांना कामगारांनी येथे बोलविले होते. २० मे १९४७ ला प्रेस येथे वेतनवाढी संबंधी आंबेडकर यांनी विचारविनिमय सभा घेतली होती. या वेळी कामगारांना त्यांच्या श्रमाचा मोबदला योग्य मिळायला हवा, कामाच्या ठिकाणी सुविधा दिल्या गेल्या पाहिजे, असा आग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धरला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाशिक रोडला आल्यानंतर त्यांचे राहण्याचे ठिकाण हे चळवळीचे केंद्र समजले जात. या ठिकाणी चळवळीच्या गीतांबरोबरच जलसा आणि शाहिरी कार्यक्रम होत असे.


जुने बौद्धविहार अजूनही आठवते
२३ मे १९४७ ला डॉ. आंबेडकर यांनी प्रेस गिरणी कामगार युनियनची सभा प्रेसच्या मैदानावर घेतली होती. ही सभा निर्णायक झाली होती. या सभेला शांताबाई दाणी, जलसाकार शाहीर रामचंद्र सोनवणे यांची उपस्थिती होती. सभेत जलसाकार रामचंद्र सोनवणे यांनी चळवळीतील गाणी आणि जलसा गीते सादर केली. डिस्टलरी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ मे १९४७ ला सायंकाळी सहा वाजता वंचित आणि चळवळीतील कार्यकर्त्यांची सभा घेतली होती. सभेला चारशे ते पाचशे कार्यकर्ते उपस्थित होते.

येथील बुद्धविहाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाल्याने ऐतिहासिक सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. बौद्धविहाराचे अलीकडच्या काळात नूतनीकरण जरी असले तरी जुने बौद्धविहार हे अजूनही जुन्या काळातील लोकांना आठवते आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर देवळाली कॅम्पलाही येऊन गेल्याचा संदर्भ येथील लोक सांगतात. या वेळी डॉ. आंबेडकर यांच्याबरोबर सहस्रबुद्धे शास्त्री हे त्यांचे अनुयायी राहत असतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार राहणार बंद; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही ट्रेडिंग होणार नाही

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SCROLL FOR NEXT