Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar with rajnath singh esakal
नाशिक

Dr. Bharati Pawar | एचएएलला साडेसहा हजार कोटींचे काम : डॉ. भारती पवार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ओझरच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला विमान निर्मितीसाठी सहा हजार ८२८ कोटींची कामे मिळाली आहे. त्याअंतर्गत एचटीटी ४० मॉडेलच्या विशेष ट्रेनर विमानांची निर्मिती केली जाणार आहे. असा दावा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला. (Dr. Bharat Pawar statement Six half thousand crore work to HAL nashik news)

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने एचएएल ला काम मिळाले आहे. संरक्षण मंत्रालयात डॉ. भारती पवार यांनी संरक्षणमंत्री यांची भेट घेतली. नाशिकच्या विकासासाठी सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन सिंग यांनी दिले. ‘न्यू इंडिया’ रणनीती अंतर्गत भारताने सर्व क्षेत्राचा समतोल विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

यात संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एचएएल ही प्रतिष्ठीत भारतीय सरकारी मालकीची एरोस्पेस आणि संरक्षण कंपनीचा समावेश आहे. सन १९६४ पासून एचएएल देशाच्या संरक्षण उत्पादनात सक्रिय सहभाग घेत आहे.

केंद्र सरकारच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या दृष्टीने देशाच्या संरक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी नाशिक एचएएल कंपनीस सदरचे विमान उत्पादनाचे कंत्राट दिल्यास नाशिक विभागासाठी सन्मानाची बाब ठरेल, या बाबत डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय रक्षामंत्री यांच्याकडे मागणी केली होती.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

त्याअनुषंगाने वायुदलात भरती होणाऱ्या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले एचटीटी ४० जातीचे ट्रेनर विशेष विमाने तयार करण्याचे काम एचएएल देण्याचा निर्णय संरक्षण विमानाने घेतला आहे.

एचएएलमध्ये यापूर्वी लढाऊ विमाने व इतर प्रकारच्या विमानाची निर्मिती करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयाने एचएएलच्या सुमारे तीन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाची संधी मिळेल. स्थानिक व्यासायिकांसह इतर उद्योगांना चालना मिळेल, असाही दावा डॉ. पवार यांनी केला.

"एचएएल ओझर येथे ६० विमानाची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी ६८२८ कोटींचा निधीला मंजुरी देण्यात आली आहे. वायु दलात नव्याने दाखल झालेल्या वैमानिकांना एचटीटी ४० जातीच्या ट्रेनर विमानाद्वारे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या विमानाचा ताशी वेग चारशे किलोमीटर असून विमान एकाच वेळेस तीन तास हवेत राहू शकेल. आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टानुसार सदरचे विमान हे पूर्णतः: भारतीय बनावटीचे राहील."

- डॉ.भारती पवार, आरोग्य राज्य मंत्री, केंद्र सरकार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT