Dr Bharti Pawar esakal
नाशिक

Nashik News : भारती पवारांना मुंबई महामार्गावरून प्रवास नकोसा; राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अव्यवस्थेचे धिंडवडे

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : एकीकडे देशात राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून रस्तेनिर्मितीत वेगाने चांगले काम केले जात असताना जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे काम मात्र प्रचंड निराशाजनक आहे.

दस्तुरखुद्द केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भर बैठकीत, मी आता मुंबई महामार्गावरून येणेच बंद केले असल्याची कबुली देत, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अव्यवस्थेचे धिंडवडे काढले.

मुंबई-आग्रा महामार्गाचे देखभाल नियंत्रण राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे. नितीन गडकरी हे त्या विभागाचे मंत्री आहेत. त्यांच्या विभागाकडून देशात मोठ्या प्रमाणात महामार्गाच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू असून, देशातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यांच्या विभागाने यशस्वीपणे राबविल्याची चर्चा असते. (dr bharti pawar not travel on mumbai highway nashik news)

गडकरी यांच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या नाशिक जिल्ह्यातून जात असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील खड्ड्यांमुळे मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री अधिक त्रस्त आहेत, याची कबुलीही मंत्री डॉ. भारती पवार यांनीच जाहीर बैठकीत दिली.

डॉ. पवार म्हणाल्या, की नाशिक-मुंबई या प्रवासादरम्यान महामार्गावर कायमच इतके खड्डे असतात, की मी स्वत: आता या रस्त्यावरून प्रवास बंद केला आहे. त्याऐवजी आता छत्रपती संभाजीनगरमार्गे प्रवास करीत असल्याची खंत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे मांडली. मंत्री, खासदार, आमदारांप्रमाणेच मुंबई-नाशिक महामार्गावरील जीवघेण्या प्रवासाला सामान्य नागरिक कंटाळले असताना मंत्र्यांनी त्यांची हतबलता मांडून केंद्राच्या अखत्यारीतील विभागाला ‘घरचा आहेर’ दिला.

मृत्यूचा सापळा

फक्त मुंबई-नाशिक महामार्गच नव्हे, तर पेठ तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ याविषयी असाच अनास्थेचा प्रकार आहे. करंजाळी घाटात महामार्गासाठी २०१६ पासून राष्ट्रीय महामार्गाकडून काम सुरू झाले. २०२३ वर्ष संपत आले, तरी हे काम पूर्ण झालेले नाही. सात वर्षांपासून वन विभागाकडून परवानगी मिळविण्यातच या विभागाने वेळ वाया घालविल्याने रस्त्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

अर्धवट सिमेंट रस्त्यामुळे ज्या रस्त्यावरून धड ट्रक चालू शकत नाही, त्या रस्त्यावरून गुजरातची अवजड मालवाहतूक सुरू झाल्याने दिवसाआड कंटेनर पलटी होतात. एकट्या करंजाळी गावात दोन वर्षांत ३२ मृत्यू झाले, इतके भयावह वास्तव पुढे आल्यावर तातडीने अवजड वाहतूक बंद करण्याचे निर्देश डॉ. भारती पवार यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यावर आमच्याकडे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा दूरध्वनी नसल्याचे सांगितले. यावर डॉ. पवार यांनी आरटीओ विभागाचा संपर्क क्रमांकही मीच द्यावा का, असे सांगत आपला रोष व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT