Union Minister of State for Health Bharti Pawar at the delisting convention organized by the Janjati Suraksha Mancha at the Golf Club ground on Sunday. In the second photo, tribal brothers attending the Maha Melavaya. esakal
नाशिक

De-listing Melava: धर्मांतरितांना आदिवासींचे आरक्षण नको! : डॉ. भारती पवार

सकाळ वृत्तसेवा

De-listing Melava : आदिवासी समाजाचे धर्मांतर करणे हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कट असल्याने हा समाज हिंदू नसल्याचा अपप्रचार करून समाजाची दिशाभूल केली जाते. पण आदिवासी समाज रावणाला नाही, तर प्रभू श्रीरामाला मानतो.

त्यांची परंपरा व संस्कृती सोडून धर्मांतर केलेल्या व्यक्तींना अनुसूचित जमातींच्या आरक्षणाचा लाभ देऊ नये. केंद्र सरकारने त्यासाठी कलम ३४२ मध्ये आवश्यक बदल करावा, अशी मागणी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केली.

या मागणीसाठी जानेवारीमध्ये दिल्लीत आदिवासी समाजाचा मेळावा घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. (Dr Bharti Pawar statement at Delisting Melava Converts do not want reservation for tribals nashik)

जनजाती सुरक्षा मंच, महाराष्ट्रतर्फे शहरातील इदगाह मैदानावर रविवारी (ता. २९) ‘डीलिस्टिंग’ महामेळावा झाला. निवृत्त न्यायाधीश प्रकाश उईके, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त ठमाताई पवार, रामचंद्र खराडी (राजस्थान), महामंडलेश्वर रघुनाथ महाराज (फरशीवाले बाबा), मौनगिरी महाराज, संभाजी महाराज पारधी, महंत बाळासाहेब कोंडार, वसंत सोनवणे, काशीनाथ भोये उपस्थित होते. ॲड. किरण गबाळे यांनी प्रास्ताविक केले.

मंत्री डॉ. पवार म्हणाल्या, की आदिवासी समाज रावणाला मानतो, असा एकतरी संदर्भ दाखवा. केवळ समाजाची दिशाभूल करण्यासाठी खोटा इतिहास सांगू नका. ‘अरण्यकांड’ व ‘वनपर्व’ यामध्ये आदिवासी समाज रामायणापासून देवाला मानत आल्याचे दाखले दिले आहेत.

देशाच्या सर्वोच्च स्थानी (राष्ट्रपती) एक आदिवासी महिला असताना त्यांच्याविरोधात अर्ज दाखल केला गेला. तेव्हा आदिवासी समाजाने विरोध का केला नाही, असा प्रश्न त्यांनी विरोधकांना केला.

आदिवासी समाज आपल्या रूढी, परंपरा जोपासत असताना त्यांना मिळणाऱ्या आरक्षणाचा लाभ धर्मांतर केलेले लोक घेत असतील, तर ते कदापि मान्य होणार नाही. त्यासाठी कलम ३४२ मध्ये आवश्यक तो बदल करण्यासाठी आम्ही लढा देणार असल्याचे मंत्री डॉ. पवार यांनी सांगितले.

२०१४ नंतर अर्थसंकल्पात आदिवासींच्या बजेटमध्ये वाढ करून एक लाख १७ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आदिवासी समाज धर्मासाठी बांधिल राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जानेवारीमध्ये दिल्लीत मेळावा

निवृत्त न्यायाधीश प्रकाश उईके यांनी प्रारंभी मोहम्मद इम्रानखान यांचा गोंड जमातीमधील दाखला सर्वांना दाखवला. ही व्यक्ती जनजाती आरक्षणाच्या आधारे शासकीय नोकरी करते, अशा पद्धतीने धर्मांतर केलेल्या व्यक्तींनी आरक्षणाचा लाभ घेतला आहे.

हिंदू धर्म सोडून मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना जनजाती आरक्षणाचा लाभ मिळू नये, यासाठी जानेवारीमध्ये दिल्लीत मेळावा घेण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला. रामचंद्र खराडी, ठमाताई पवार यांनीही विचार व्यक्त केले.

तत्पूर्वी आदिवासींच्या पारंपरिक नृत्याने महामेळाव्यास प्रारंभ झाला. आमदार सीमा हिरे, आमदार ॲड. राहुल ढिकले, भाजप नेते किशोर काळकर, महेश हिरे, गणेश गिते, श्याम बोडके यांसह अहमदनगर, नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांतील आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.

‘आदिवासींनी मोहाची दारू प्यावी’

आदिवासी समाज हा हिंदू आहे, कुठल्याही ग्रंथात आपण शोध घेतला, तर आदिवासींची रूढी व परंपरा या देवाचे पूजन करणाऱ्या आहेत. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले जातात.

अपप्रचार करणाऱ्यांनी समाजासाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित करत रघुनाथ महाराज अर्थात, फरशीवाले बाबांनी विविध दाखले दिले. बोलण्याच्या ओघात त्यांनी आदिवासींना दारू पिण्याचा सल्ला दिला.

मोहाची दारू पिणारा मूळ आदिवासी आहे. ती दारू पिणे योग्य; पण काही लोक ‘जय रावण’ म्हणतात आणि स्वस्तातील दारू रिचवितात. हा कुठला धर्म, असा प्रतिसवालही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT