Onion Subsidy : कसमादेसह तालुक्यात उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले असून भाव नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. चाळींमध्ये कांदा खराब होवू लागल्याने मिळेल त्या किमतीत शेतकरी विक्री करीत आहेत.
आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जूनपर्यंत विक्री झालेल्या कांद्याला सरसकट प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते डॉ. जयंत पवार यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (Dr Jayant Pawar statement pn Subsidize all onions sold till June nashik news)
मालेगावसह कसमादे पट्ट्यात यावर्षी उन्हाळी कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मुबलक खर्च करून पीक घेतले. जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात तर कांदा अवघा दीडशे ते दोनशे रुपये क्विंटलने विकला गेला.
शेतकरी संघटना व विरोधी पक्ष रस्त्यावर उतरल्याने मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारी अखेर विकलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले. मुळात हे अनुदान अतिशय कमी व तुटपुंजे आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
चार महिने उलटले तरीदेखील शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे.
शासनाने आठ दिवसाच्या आत अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी. चाळींमध्ये सडलेल्या कांद्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील डॉ. पवार यांनी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.