Inspirational News : शासकीय रुग्णालयात जिल्हाभरातूनच नव्हे तर लगतच्या जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येतात. त्यातच अनेकांची परिस्थितीही हलाखीची असते. रुग्णाला रुग्णालयातून आहार मिळतो, परंतु रुग्णासमवेत असलेल्या नातेवाइकाला भोजनाची व्यवस्था करावी लागते. अशावेळी रुग्णालयात अनेक दानशूरांकडूनही अन्नदान केले जाते.
परंतु महात्मानगर परिसरातील एक युवती गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात ठराविक दिवशी किमान दोनशे ते अडीचशे नागरिकांचे भोजन मोफत वाटप करते आहे. (Dr Priya Digraskar distributes free food to at least 200 to 2500 citizens nashik news)
विशेषतः सदर उपक्रम हा तिच्या वेगवेगळ्या शहरात, देशात, विदेशात असलेल्या मित्रांच्या माध्यमातून राबविते आहे.
डॉ. प्रिया डिग्रसकर या शहरातील महाविद्यालयात विद्यादानाचे काम करते. डॉ. प्रिया डिग्रसकर यांची शिर्डीचे साईबाबा यांच्यावर मनोभावे श्रद्धा आहे. भुकेलेल्या अन्नदान करण्याची साईबाबा यांची शिकवण आहे. याच शिकवणीतून डॉ. डिग्रसकर यांनी सदर उपक्रम सुरू केला आहे. मोफत अन्नदानासह त्या गरजूंना लहान मुलांचे कपडेही मोफत दान करतात. तसेच, उपक्रम राबवीत असताना ‘ओम साई नामा’चा जप करण्याचेही आवाहन करतात.
कोरोनाकाळात सर्वच बंद होते. या काळात फिरस्ते लोकांसमोर दोन वेळच्या जेवणाची मोठी समस्या उभी होती. हीच बाब हेरून डॉ. डिग्रसकर यांनी स्वखर्चातून घरातच अन्न शिजविले आणि भाजी-पोळीचे पॅकेट तयार करून फिरस्त्यांना त्यांच्या ठिकाणी जाऊन वाटप केले. या साऱ्या उपक्रमातून त्यांना चांगले मानसिक समाधान मिळाले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कोरोनाकाळात त्यांचा हा उपक्रम सातत्याने राबविला. यासाठी त्यांना शहरातील काहींनी मदतीचा हातभारही लागला. त्यानंतर, त्यांनी जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातलगांसाठीही आठवड्यातील शनिवारी- रविवारी नियमित मोफत भोजन देणे सुरू केले. सदर उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून नित्यनेमाने सुरू आहे.
व्हॉटसॲप ग्रुप आला धावून
डॉ. प्रिया डिग्रसकर या मूळच्या नागपूरच्या. त्यांची कोणतीही सेवाभावी संस्था नाही. तर, त्यांचा महाविद्यालयीन मित्र- मैत्रिणींचा व्हॉटसॲप ग्रुप आहे. या ग्रुपवर त्यांनी उपक्रमांची माहिती शेअर केली. ग्रुपमधील मित्र-मैत्रिणींना उपक्रम भावला आणि त्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शविली. महाराष्ट्रासह देश-परदेशात असलेल्या त्यांच्या मित्र-मैत्रिणींमुळे या उपक्रमाला अधिक चालना मिळाली.
यानुसार, डॉ. डिग्रसकर या महिन्यातील मोफत भोजन देण्यासाठीचा एक तक्ता तयार करून महिन्यात कितीवेळा जेवण द्यायचे आहे, याची माहिती ग्रुपवर देतात. त्यानुसार त्यांचे मित्र प्रत्येक दिवस निवडून त्याची जबाबदारी घेतात आणि त्यासाठी लागणारा निधी पाठवून देतात. त्याप्रमाणे, कोणाचा वाढदिवस, वा अन्य काही तात्कालिक कारण असेल तर त्यानुसारही भोजन तयार करून अन्यवेळीही जिल्हा रुग्णालयात मोफत अन्नदान केले जाते.
"आमची कोणतीही सेवाभावी संस्था नसून, केवळ मित्र-मैत्रिणीच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयातील गरजूंना मोफत अन्नदान केले जाते. दोनशे जणांसाठी भाजी-पोळी, कधी पुलाव भात, गोड शिरा वा अन्य काही गोडपदार्थ असे जेवण दिले जाते. साईबाबांची शिकवणीप्रमाणे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो." - डॉ. प्रिया डिग्रसकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.