Fake Medical Certificate case esakal
नाशिक

Nashik : डॉ. श्रीवास, डॉ. सैंदाणे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आंतरजिल्हा बदल्या वा आजारपणासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या बोगस वैद्यकीय प्रमाणपत्राप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जिल्हा शासकीय रुग्णालयाचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास व डॉ. निखिल सैंदाणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला.

यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असून, गेल्या आठवडाभरापासून दोघेही नॉट रिचेबल आहेत. दरम्यान, या प्रकरणी ग्रामीण पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागून आहे. (Dr Shrivas Dr Saidane pre arrest bail application rejected fake medical certificate case Nashik News)

नाशिक ग्रामीण पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनी आंतरजिल्हा बदल्या वा आजारपणासाठी ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केले होते. सदरची बाब उघडकीस आल्याने या प्रकरणी नाशिक तालुका पोलिसात मुख्यालयाच्या वरिष्ठ लिपिक हिरा कनोज, जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी कांतिलाल गांगुर्डे व लिपिक किशोर पगारे, खासगी डॉ. स्वप्नील सैंदाणे, डॉ. वीरेंद्र यादव यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिरा कनोज, कांतिलाल गांगुर्डे यांना अटक करून चौकशी करण्यात आलेली आहे.

याचप्रकरणी, पोलिसांनी जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास, डॉ. निखिल सैंदाणे यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. यात एकदा त्यांचा जाबजबाब घेण्यात आलेला असून, पोलिसांनी पुन्हा नोटीस बजावून जबाबासाठी बोलावले होते. परंतु, पोलिसांकडून अटकेच्या भीतीने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली.

त्यावर मंगळवारी (ता.२०) सुनावणी होऊन, दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लागले आहेत. त्यामुळे दोघे आता उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पोलिसांकडूनही दोघांवर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून दोघेही डॉक्टर जिल्हा रुग्णालयात आलेले नसून, नॉट रिचेबल आहेत.

पोलिसांकडून संथगतीने तपास

बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी नाशिक तालुका पोलिसात गुन्हा दाखल असून, तपासाची गती मात्र संथ झाली आहे. या प्रकरणात तालुका पोलिसांनी आत्तापर्यंत दोघांना अटक करून त्यांची चौकशी केली आहे. तसेच, जिल्हा रुग्णालयाकडे त्या बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रावर ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत, त्यांची नावे तालुका पोलिसांनी मागविली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

"जितकं तू बोलतोस तितका चांगला माणूस तू अजिबात नाहीस" ; जवान फेम अभिनेत्री नयनताराचा धनुषवर खळबळजनक आरोप

Ranji Trophy 2024-25: Ayush Badoni चं दमदार द्विशतक; दिल्लीला आघाडीही मिळाली, पण सामना राहिला ड्रॉ

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

SCROLL FOR NEXT