नाशिक : संरक्षण आणि संशोधन विकास संस्थेने (डीआरडीओ) अतिउंच भागातील सैनिकांसाठी ब्लड ऑक्सिजन सॅच्युरेशन (एसपीओटू) आधारित पूरक ऑक्सिजन पुरविणारी प्रणाली विकसित केली आहे. डीआरडीओच्या बेंगळुरूच्या संरक्षण बायो-इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रो वैद्यकीय प्रयोगशाळेने केलेले हे संशोधन कोरोना काळात वरदान ठरणार आहे.
रुग्णांना ऑक्सिजन संकट कमी करण्यासाठी उपयुक्त
एखादी व्यक्ती हायपोक्सिया म्हणजेच, पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळणे अशा अनेकदा प्राणघातक ठरणाऱ्या स्थितीत जाण्यापासून ही प्रणाली वाचवू शकते. सामान्यासाठी वापरण्यासाठी सुलभ अशा या सुविधेमुळे ही प्रणाली रुग्णाच्या एसपीओटू पातळीवर देखरेख करण्यासाठी डॉक्टर आणि निमवैद्यकीय यंत्रणेवरचा ताण कमी करणार आहे. कोरोना रुग्णांसाठी संकट कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
प्रणाली अतिशय मजबूत आणि स्वस्तही.
शरीराची ऊर्जेची आवश्यक गरज भागविण्यासाठी पेशींमध्ये पोचणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण अपुरे असणे म्हणजे हायपोक्सिया स्थिती. कोरोना विषाणू संसर्गामुळे कोरोना रुग्णामध्ये अशी परिस्थिती उद्भवते आणि सध्याच्या संकटातली ही एक महत्त्वाची स्थिती अर्थात लक्षण आहे. यातील इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर प्रणाली ही हवेचा दाब, तापमान आणि आर्द्रता कमी असणाऱ्या अतिशय उंच भागासाठी तयार करण्यात आली आहे. मनगटावरच्या पल्स ऑक्सिमीटर मॉड्यूलमधून वायरलेस इंटरफेसद्वारे ही यंत्रणा व्यक्तीची एसपीओटू पातळी जाणते आणि सोलनॉइड व्हॉल्व्ह नियंत्रित करून ऑक्सिजन पुरवठा नियमित करते. वजनाला हलक्या आणि सहज वाहून नेता येऊ शकणाऱ्या ऑक्सिजन सिलिंडरमधून नाकपुड्यांद्वारे ऑक्सिजन दिला जातो. एक लिटर आणि एक किलो वजनाच्या दीडशे लिटर ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या प्रणालीपासून ते १० लिटर आणि १० किलो वजनाच्या दीड हजार लिटर ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या आणि प्रतिमिनिट दोन लिटर वेगाने ७५० मिनिटांपर्यंत राहू शकणाऱ्या अशा विविध आकारांत ही प्रणाली उपलब्ध आहे. स्थानिक परिस्थितीत वापरता येण्यासाठी स्वदेशात विकसित करण्यात आलेली ही प्रणाली अतिशय मजबूत आहे. त्याचबरोबर स्वस्तही आहे. उद्योगामध्ये त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू आहे.
घरी नियंत्रित उपचारपद्धती
कोरोना महामारीच्या काळात प्रणालीचा वापर मध्यम संसर्ग असणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी घरी नियंत्रित दोन, पाच, सात, दहा लिटर प्रतिमिनिट ऑक्सिजन वहन उपचारपद्धतीसाठी शक्य होणार आहे. एसपीओटू कमी झाल्यास ऑक्सिमीटर धोक्याची सूचना देणार आहे. ते आपोआप ऑक्सिजनची पातळी कमी अथवा अधिक करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.