नाशिक

Nashik Crime News : नादुरुस्त शिवशाही बस मध्ये गळफास घेऊन चालकाची आत्महत्या

अजित देसाई

Nashik News : सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पांगरी शिवारात बुधवारी दुपारी पावणेतीन वाजेपासून बिघाडामुळे उभी असलेल्या शिवशाही बस मध्ये चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

राजू हिरामण ठुबे (49) रा दोनवाडे (भगूर), ता. नाशिक असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे. चालक श्री. ठुबे हे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगार क्रमांक एक मध्ये कार्यरत होते. (Driver commits suicide by hanging himself in faulty Shivshahi bus In afternoon bus broke down on Pavnetin incident came to light around half past midnight Nashik News)

शिर्डी येथून नाशिककडे शिवशाही बस क्रमांक एम एच 09 ई एम 1280 घेऊन ते जात असताना दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास वावी सोडल्यानंतर पांगरी शिवारात बस नादुरुस्त झाली.

या बसमधील प्रवाशांना पाठीमागून येणाऱ्या बस मध्ये बसवून दिल्यानंतर श्री. ठुबे यांनी सिन्नर आगारात निरोप देऊन दुरुस्ती पथक पाठवण्याची विनंती केली होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत सिन्नर येथील दुरुस्ती पथक न आल्यामुळे त्यांच्यासोबत असलेली महिला चालक देखील निघून गेली.

त्यामुळे बस सोबत चालक श्री. ठुबे एकटेच होते. रात्री सव्वा ते दीड वाजेच्या सुमारास सिन्नर येथील दुरुस्ती पथक बस जवळ आले. आवाज देऊनही चालक श्री. ठुबे यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पथकातील कर्मचारी बसमध्ये चढले.

अंधार असल्याने मोबाईलचे टॉर्च लावले असता पाठीमागे शेवटच्या सीटजवळ त्यांचा लटकलेला मृतदेह आढळून आला. कमरेच्या करदोऱ्याच्या साह्याने छताकडच्या एअर विंडोच्या हुकला अडकवून घेत चालक श्री. ठुबे यांनी आत्महत्या केली होती.

ही बाब दुरुस्ती पथकातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ सिन्नर आजारात कळवून वावी पोलिसांना सूचित केले. रात्री दीड वाजता घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या पथकाने खाजगी रुग्णवाहिकेतून चालक ठुबे यांचा मृतदेह सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नाशिकचे विभाग नियंत्रक अरुण सिया, सहाय्यक विभाग नियंत्रक नितीन मैण्ड यांच्यासह राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून चालक श्री. ठुबे यांनी आत्महत्या का केली याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झाली नाही.

सिन्नर आगारातील दुरुस्ती पथक सकाळपासूनच वेगवेगळ्या ठिकाणी नादुरुस्त असलेल्या बसच्या दुरुस्तीमध्ये व्यस्त होते.

त्यामुळे शिवशाही बस दुरुस्त करण्यासाठी यायला रात्री उशीर झाला यादरम्यान चालक श्री. ठुबे यांनी नैराश्यपोटी की आणखी कोणत्या कारणामुळे टोकाचा निर्णय घेतला याबाबत पोलीस तपासात माहिती समोर येईल. रात्री उशिरापर्यंत बसमध्ये थांबून असलेल्या श्री ठुबे यांनी जेवण घेतले की नाही याबाबतही कोणतीही माहिती समोर आली नाही.

घडलेली घटना अतिशय धक्कादायक आहे. दुपारी पावणेतीन वाजता बसणार दुरुस्त झाली होती. मात्र सिन्नर मधील पथक चार ठिकाणी ब्रेक डाऊन असलेल्या वाहनांची दुरुस्ती करण्यात व्यस्त होते.

त्यामुळे शिवशाही बस दुरुस्तीसाठी यायला उशीर झाला. यादरम्यान चालक श्री. ठुबे यांचा कोणाशी संपर्क झाला होता की नाही याबाबत पोलीस तपासात माहिती समोर येईल.

चालक श्री. ठुबे यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात परिवहन महामंडळ सहभागी आहे अशी प्रतिक्रिया नाशिकचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT