सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर- घोटी राष्ट्रीय महामार्गावर घोरवड घाटाजवळ कारला लागलेल्या आगीत चालकाचा 70 टक्के भाजल्याने मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास घडली. सीएनजी किट असलेली कार चहूबाजूंनी पेटल्याने चालकाला जीव वाचवण्याची कुठलीच संधी मिळाली नाही. आग विझवल्यावर कारच्या सापळ्यात चालकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
...अन् कारने पेट घेतला
विठ्ठल कृष्णा उर्फ किसन कोकाटे (23) राहणार चिचोंडी पाटी (अहमदनगर), हल्ली मुक्काम खारघर, मुंबई असे या अपघातातील दुर्दैवी चालकाचे नाव आहे. विठ्ठल हे त्यांच्या कारने (MH-46-BB-6261) घेऊन शिर्डीहून मुंबईच्या दिशेने जात होते. पहाटे चार वाजेच्या सुमारास सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवड घाटाच्या तोंडाशी असलेल्या हॉटेल शिवबा जवळ कारने पेट घेतला. सीएनजी गॅस किट असलेली ही कार चहूबाजूंनी पेटल्याने चालक विठ्ठल यांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. चालकाच्या सीटवरच आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. कारने पेट घेतल्याचे पाहिल्यावर खापराळे फाट्याजवळ असलेल्या हॉटेलमधील कर्मचारी व तेथे थांबलेल्या वाहनांच्या चालकांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आगीत कारचा केवळ सांगाडा राहिला. तर 70 टक्के भाजलेल्या अवस्थेत ओळख न पटण्याच्या पलीकडे विठ्ठल यांचा मृतदेह शिल्लक राहिला.
या घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक उपनिरीक्षक गणेश परदेशी यांनी सहकाऱ्यांसमवेत धाव घेतली. सांगाडा शिल्लक असलेल्या कारच्या चेसी नंबर वरून पोलिसांनी कारच्या मूळ मालकाचा शोध लावत चालक विठ्ठल कोकाटे यांची ओळख पटवली. सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.