नाशिक : नाशिक पुणे महामार्गावरील गांधीनगर वसाहतीसमोर असलेल्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल (कॅट) च्या लष्कराच्या प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन उडताना आढळले. लष्कराच्या संवेदनशील क्षेत्रात टेहाळणीच्या संशयाने लष्करी यंत्रणा सर्तक झाली.
गांधीनगर कॅटचा हा लष्करी विमानतळ 'नो ड्रोन झोन' लष्करी यंत्रणा ड्रोन उडवण्यासाठी सरसावले असतांना, ड्रोन गायब झाल्याने शोध सुरू आहे.
गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.कॅटकेंद्रातील बेस ड्युटी आधिकारी मनदिपसिंग ईश्वर सिंग (वय ३५, रा.मिलिटरी क्वार्टस्) यांच्या तक्रारीनुसार, एअर ट्राफिक कंट्रोलच्या
कार्यालयात नायक जर्नेलसिंग यांनी, कॅटसच्या हद्दीत ड्रोन उडत असल्याची माहिती मेजर आशिष यांनी कळवल्यानंतर मनदिपसिंग यांनी पाहाणी केली असता ८०० फुट उंचावर एक ड्रोन दिसले. त्यांनी तत्काळ बेस सिक्युरीटी ऑफिसर लेफ्ट. कर्नल व्ही रावत यांना ड्रोनबाबत कळवून ते फायरींग करून पाडण्याची परवानगी मागितली. पण तोपर्यत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्रातून गायब झाले.
लष्करी केंद्राची रेकी ?
देशाच्या सीमावर्ती भागात ड्रोनद्वारे हल्ल्याच्या घटनानंतर शहरातील
तोफखाना केंद्र, एयर फोर्स, रेल्वे स्थानक, वीज निर्मिती केंद्र, चलार्थ
पत्र मुद्रणालय, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी अशी विविध १६ संवेदनशील ठिकाणे सुरक्षेच्या दृष्टीने मानवरहित विमानांच्या उड्डाणास प्रतिबंधित क्षेत्र अर्थात ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ आहे. या परिसराच्या दोन किलोमीटरच्या परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, गरम हवेचा
फुगा, कमी वजनाची विमाने किंवा तत्सम हवाई साधनांचा पूर्व परवानगी
शिवाय उड्डाणस मनाई असतानाही लष्कराच्या संवेदनशील आणि प्रतिबंधित क्षेत्रात शिरलेले ड्रोन रेकी साठी होते काय ? या संशयाने लष्करी
यंत्रणा मात्र सर्तक झाली आहे.
ड्रोण शुटचे आदेश
याबाबत लेफ्ट. कर्नल व्ही रावत यांनी परत जर ड्रोन आले तर शुट
करून पाडून टाका असे आदेश दिले. तसेच पोलिसांनाही याबाबत
कळवण्याचे सांगितलं. त्यानुसार कॉम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग
स्कूल (सीएटीएस) परगेएरिया 'नो ड्रोन झोन' व प्रतिबंधीत क्षेत्र
असल्याने या ठिकाणी कोणालाही ड्रोन उडविण्यास बंदी असतांना गुरुवारी (ता.२५) रात्री दहाच्या सुमारास प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन उडवून नियमाचा भंग केला आहे म्हणून अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा झाला आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.