Drugs will centre point in election by thackeray and shinde shiv sena group nashik news esakal
नाशिक

Lalit Patil Drug Case : निवडणुकीच्या केंद्रस्थानी ड्रग्ज! दोन्ही सेनेत ललित पाटीलच्या प्रवेशावरून जुंपणार

सकाळ वृत्तसेवा

Lalit Patil Drug Case : मागील पावणेदोन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांअभावी मरगळ आलेल्या राजकीय क्षेत्रात नाशिकमध्ये सापडलेले एमडी ड्रग्ज प्रकरणाने आरोप-प्रत्यारोपांमुळे जान आली आहे.

आगामी महापालिका, लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुकीतदेखील ड्रग्ज हाच मुद्दा केंद्रस्थानी राहून विकासाचे मुद्दे बाजूला पडणार आहे. त्यामुळे आरोप- प्रत्यारोपांच्या तोफांमध्ये दारूगोळा भरण्यासाठी राजकीय पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे.

दसरा मेळाव्यात नाशिक हेच केंद्रस्थानी राहील तेथूनच नाशिकच्या आगामी निवडणुकांच्या प्रचाराची दिशा ठरणार आहे. दोन्ही सेनेत ललित पाटीलच्या प्रवेशावरून चांगलीच जुंपणार असल्याचे दिसत आहे. (Drugs will centre point in election by thackeray and shinde shiv sena group nashik news )

गेल्या वर्षाच्या मार्चमध्ये महापालिकेची मुदत संपुष्टात आली, त्यानंतर निवडणुका होणे अपेक्षित होते. परंतु ओबीसी व मराठा आरक्षण त्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात तयार केलेल्या प्रभाग रचनेवरून न्यायालयात दावे दाखल झाल्याने आतापर्यंत निवडणुका लांबल्या आहेत.

वास्तविक राज्यातील सत्ताधारी पक्षाने ठोस भूमिका घेतल्यास निवडणुका होवू शकतात. परंतु राज्यातील २६ महापालिका व तेवढ्याच जिल्हा परिषदांवर प्रशासक असल्याने थेट संबंध राहतं आहे व सत्ताधाऱ्यांविरुद्ध वातावरण असल्याने निवडणुका लांबणीवर पडतं असल्याचे बोलले जात आहे. निवडणुका नसल्याने सर्वपक्षीय इच्छुकांमध्ये खदखद वाढली आहे.

खर्च करून इच्छुक वैतागले

दिवाळी, दसरा, नवीन वर्ष तसेच जयंती आदी कार्यक्रमांवर खर्च करून इच्छुक वैतागले. प्रचाराचा खर्च कार्यक्रमांमध्येच खर्च होत असल्याने अनेक इच्छुकांनी प्रचाराच्या तलवारी म्यान केल्या. देशात व राज्यात काय चालले याकडेच इतक्या दिवस लक्ष केंद्रित असताना नाशिकमधील ड्रग्ज प्रकरणाने राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे. शिंदे गावात ड्रग्जचा कारखाना मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केला.

त्यातून जवळपास तीनशे कोटींचे ड्रग्ज हस्तगत केल्याचा पोलिसांचा दावा आहे. ड्रग्ज प्रकरण उघड झाल्यानंतर पुढे राजकीय धागेदोरे उघड होवू लागले आता नाशिक राज्याच्या केंद्रस्थानी आल्यानंतर मोर्चे, आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणुकांमध्येदेखील हाच मुद्दा चर्चेला राहणार आहे. त्याअनुषंगाने राजकीय पक्षांनी कंबर कसली असून ड्रग्ज प्रकरणात प्रचारात शिवसेनेच्या ठाकरे गट व शिंदे गटात सामना पाहायला मिळणार आहे.

भाभी...प्रवेश...पालकमंत्री

ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आरोप केल्यानंतर राजकीय कनेक्शनचा मुद्दा समोर आला. शहरातील एका आमदाराचा आरोपींना वाचविण्यात सहभाग असून अधिवेशनात पुरावे जाहीर करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे भाजपच्या महिला आमदारावर ड्रग्ज प्रकरणाचा फोकस झाला.

त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून संशयित ललित पाटील याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबतचे फोटो व्हायरल करण्यात आल्यानंतर दोन्ही शिवसेना आमने-सामने आल्या. भाजपवरील फोकस पालकमंत्र्यांकडे आल्यानंतर ठाकरे-शिंदे सेनेकडून आरोपांना प्रत्युत्तर दिले गेले. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडूनदेखील पालकमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला. शुक्रवारी शिवसेनेने महामोर्चा काढला.

त्यात खासदार संजय राऊत यांनी आमदारांना पंधरा लाखांचे हप्ते, तर मोठी भाभी म्हणून अप्रत्यक्ष भाजपच्या एका आमदाराचा उल्लेख केल्याने राजकारण तापले. त्याचा तातडीने खुलासा भाजप कार्यालयात तीनही आमदारांनी केला, तर दुसरीकडे मुंबईत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील महाविकास आघाडीच्या काळात संशयित ललित पाटील यांच्या ससून रुग्णालयाच्या मुक्कामाचा उल्लेख करून भाजपवर होत असलेले आरोपांचा धुरळा कमी करण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर दसरा मेळाव्यात खुलासा करण्याचे जाहीर केले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये किमान नाशिक मध्ये विकासाऐवजी ड्रग्ज व राजकीय साखळीवर होणारे आरोप-प्रत्यारोप ऐकायला मिळणार असून त्यादृष्टीने राजकीय पक्षाकडून तयारी सुरू झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT